Covid 19 Vaccination Registration: 18 वर्षांवरील नागरिकांसाठी 28 एप्रिलपासून सुरू होतयं रजिस्ट्रेशन; इथे पहा आवश्यक डॉक्युमेंट्स, शुल्क, CoWIN Portal वर कशी कराल नोंदणी

त्यामुळे 18 वर्षावरील सर्वांना येत्या 28 एप्रिल पासून CoWin पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

Vaccination in India. (Photo Credits: IANS|File)

केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांपूर्वी असे जाहीर करण्यात आले आहे की, 18 वर्षावरील सर्वांना येत्या 1 मे 2021 पासून कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यामुळे 18 वर्षावरील सर्वांना येत्या 28 एप्रिल पासून CoWin पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येणार आहे. येथे रजिस्ट्रेशन करताना तुमच्या घराजवळील लसीकरण केंद्र, लस घेण्याची तारीख आणि वेळ सुद्धा तुम्हाला दाखवली जाणार आहे. तर काही लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनसह रशियाची स्पुटनिक व्ही लस दिली जात असल्याचे रिपोर्ट्सनुसार सांगण्यात आले आहे.(Triple Mutation in India: चिंता वाढली! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये समोर आले विषाणूचे 'ट्रिपल म्टेयूशन'; महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल याठिकाणी नव्या व्हेरिएंटची शक्यता)

एनएचएचे चीफ एक्झिक्युटिव्ह आरएस शर्मा यांनी असे म्हटले की, केंद्र सरकारकडून लसीकरण केंद्राची क्षमता वाढवली जात आहे. तर नव्या कोरोनाच्याा नियमावलीनुसार, राज्य आणि खासगी संस्थांना थेट उत्पादकांकडून लस खरेदी करता येणार आहे.(Covid 19 Outbreak In India: भारतामध्ये पहिल्यांदाच कोरोनाबाधितांचा 24 तासांतील आकडा 3 लाखांच्याही पार; दिवसभरात 3,14,835 नवे रूग्ण समोर 2,104 मृत्यू)

>>कसे कराल CoWin वर रजिस्ट्रेशन:-

-प्रथम कोविन पोर्टल www.cowin.gov.in ला भेट द्या.

-येथे गेल्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करा.

- लॉगिन केल्यानंतर महत्वाची तुम्हाला येथे माहिती द्यावी लागणार आहे.

-आता तुम्हाला तुमच्या घराजवळील लसीकरण केंद्रावर लस कधी घ्यायची हे ठरवता येणार आहे.

-ज्या दिवशी आणि वेळी तुम्हाला लस घ्यायची आहे तेव्हा लसीकरण केंद्रावर उपस्थितीत रहा.

-नागरिकांना स्वत:सह अन्य तीन जणांचे सुद्धा रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्याचसोबत शेड्युल करण्यात आलेले रजिस्ट्रेशन तुम्ही रद्द सुद्धा करु शकता.

>>प्रक्रिया:-

रजिस्ट्रेशन केलेल्या व्यक्तीला त्यांच्या मोबाईक क्रमांकावर एक SMS येईल. पहिला मेसेज येईल तेव्हा व्यक्तीला रजिस्ट्रेशन कंन्फर्मेशन बद्दल सांगण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या मेसेजमध्ये कंन्फर्म तारीख, वेळ आणि लसीकरण केंद्राबद्दल कळवले जाईल. आता लस घेतल्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेस त्या संदर्भातील एसएमएस तुम्हाला मिळेल. पहिला डोस घेतल्यानंतर 30 मिनिटे तुम्हाला निगराणीखाली ठेवले जाईल.

>>रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाईल अॅपची गरज आहे का?

भारतात लस घेण्यासाठी कोणतेही अधिकृत अॅप उपलब्ध नाही आहे. त्यामुळे तुम्हाला CoWin पोर्टला भेट देऊन तेथे रजिस्ट्रेशन करता येणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही ArogyaSetu App ची सुद्धा मदत घेऊ शकता.

>>आधार कार्डाशिवाय लस घेता येईल का?

होय, लसीकरण करण्यासाठी तुम्हाला कोविन अॅपवर खालील कोणत्याही एका कागदपत्राची पुर्तता करावी लागणार आहे.

-आधार कार्ड

-वाहन परवाना

-पॅन कार्ड

-पासपोर्ट

-पेन्शन पासबुक

-एनपीआर स्मार्ट कार्ड

-मतदान कार्ड

>>रजिस्ट्रेशनसाठी शुल्क मोजावे लागतात का?

नाही. रजिस्ट्रेशनसाठी कोणत्याही प्रकारे शुल्क घेतले जात नाहीत.

>>लसीकरण शुल्क

सर्व शासकीय केंद्रांत नागरिकांना कोरोनाची मोफत लस दिली जात आहे. मात्र जर तुम्ही खासगी केंद्रात किंवा रुग्णालयात लस घेण्यासाठी गेल्यास तुम्हाला प्रति डोससाठी तेथे 250 रुपये लसीकरणासाठी मोजावे लागणार आहेत.