Covaxin Fact Sheet: कोव्हॅक्सिन संदर्भात भारत बायोटेकने जारी केल्या मार्गदर्शक सूचना; सांगितले कोणी घेऊ नये ही लस

भारत बायोटेकने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

16 जानेवारीपासून भारतात कोरोना विषाणू (Coronavirus) लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. लोकांना कोरोना लसीकरणादरम्यान होणाऱ्या दुष्परिणामांविषयी सावध करण्यासाठी भारत बायोटेकने (Bharat Biotech) एक तथ्यपत्रक जारी केले आहे. भारत बायोटेकने सांगितले आहे की, एखाद्याची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास किंवा एखादी व्यक्ती गंभीर आजारासाठी आधीच एखादे औषध घेत असेल, तर अशा लोकांनी कोव्हॅक्सिन (Covaxin) लस घेऊ नये. भारत बायोटेकने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, ज्यामध्ये नमूद केले आहे की कोणी कोणी ही लस घेऊ नये.

इंडिया बायोटेकने असे आवाहन केले आहे की, ज्या लोकांना कोणत्याही प्रकारचे एलर्जी किंवा गंभीर आजार आहेत त्यांनी लस घेण्यापूर्वी सर्व गोष्टींची माहिती दिली पाहिजे.

खाली नमूद केलेल्या लोकांनी ही लस घेऊ नये –

यापूर्वी सरकारकडून निवेदनात म्हटले होते की, ज्या रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती कमी आहे असे लोकही कोविड लस घेऊ शकतात. मात्र, लसीच्या चाचणी दरम्यान अशा लोकांवर होणारा परिणाम तुलनेने कमी दिसून आला आहे. कर्करोगाचे रुग्ण, एचआयव्ही-पॉझिटिव्ह लोक आणि स्टिरॉइड्स घेणारे लोक सहसा इम्यूनो-सप्रेस्ड असतात, म्हणजे त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते व अशा रुग्णांमध्ये संक्रमणाचा धोका जास्त असतो. म्हणून अशा लोकांनी ही लस घेऊ नये. (हेही वाचा: Facial Paralysis: इस्राईलमध्ये कोरोना विषाणूची लस दिल्यांनतर 13 जणांना चेहऱ्याचा अर्धांगवायू; दुसरा डोस देण्याबाबत भीती)

लस घेतल्यानंतर खालील दुष्परिणाम जाणवू शकतात –

भारत बायोटेकने आपल्या फॅक्टशीटमध्ये असेही सूचित केले आहे की, कोव्हॅक्सिनचा डोस घेतल्यानंतर कोविड-19 संसर्गाची लक्षणे दिसत असल्यास ताबडतोब आरटी-पीसीआर चाचणी करावी. सध्या भारतात, सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन यांना मान्यता दिली असून, याचीच लसीकरण मोहीम सुरु आहे. दरम्यान, कोव्हॅक्सिन सध्या तिसर्‍या टप्प्यातील ट्रायलमध्ये आहे आणि त्याचा प्रभावीपणा अद्याप सिद्ध झाला नाही. तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल डेटाचा अभ्यास केला जात आहे.