Coronavirus in India: देशातील कोरोना बाधितांचा आकडा 21,53,011 वर; मागील 24 तासांत 64,399 नवे कोरोनाग्रस्त तर 861 रुग्णांचा मृत्यू
मागील 24 तासांत 64,399 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 861 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 21,53,011 वर पोहचला आहे.
देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) उद्रेक सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. आजही त्यात मोठी भर पडली आहे. मागील 24 तासांत 64,399 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 861 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 21,53,011 वर पोहचला आहे. त्यापैकी 6,28,747 अॅक्टीव्ह केसेस (Active Cases) असून 14,80,885 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर कोरोना संसर्गामुळे बळी गेलेल्यांची संख्या 43,379 इतकी आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health) देण्यात आली आहे.
दरम्यान कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंता वाढवत असली तरी वरील आकडेवारी पाहता देशात अॅक्टीव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट सुधारत आहे. देशात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे. (मुंबई, पुणे, अकोला, रत्नागिरीसह तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण? जाणून घ्या एका क्लिकवर)
ANI Tweet:
Single-day spike of 64,399 cases and 861 deaths reported in India, in the last 24 hours.
The #COVID19 tally rises to 21,53,011 including 6,28,747 active cases, 14,80,885 cured/discharged/migrated & 43,379 deaths: Ministry of Health pic.twitter.com/FGm4qSg63m
— ANI (@ANI) August 9, 2020
टेस्ट, ट्रॅस आणि ट्रिट या माध्यमातून देशातील कोरोना व्हायरसची परिस्थिती नियंत्रणात ठेवली जात आहे. तसंच नागरिकांच्या सहकार्यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत आहे. दरम्यान देशात अनलॉक 3 ला सुरुवात झाली असून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आणण्यात येत आहे. कोविड-19 संकटामुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. त्यामुळे कोरोनाच्या लसीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2020 09:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

