Rahul Gandhi on Central Government: हा विकास आहे की विनाश? राहुल गांधी यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

त्यामुळे नागरिकांच्या मनौधैर्यावर मोठ्या प्रमाणावर परीणाम होत आहे. नागरिकांचे मनौधैर्य खचत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी टविटरच्या माध्यमातून हा हल्ला चढवला आहे.

Rahul Gandhi, PM Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काँग्रेस (Congress ) पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर ( Central Government) जोरदार टीकास्त्र सोडले आहे. दशाची अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांमुळे महागाई (Inflation), बेरोजगारी (Unemployment ) अशा समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनौधैर्यावर मोठ्या प्रमाणावर परीणाम होत आहे. नागरिकांचे मनौधैर्य खचत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी टविटरच्या माध्यमातून हा हल्ला चढवला आहे.

राहुल गांधी यांनी आपलया ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशातील विकास दर आणि बँका मोठ्या अडचणीत आहेत. देशात महागाई, बेरोजगारी यांचा आकडा इतका मोठा कधीच नव्हता. या सर्वांमुळे देशातील नागरिकांचे मनोधैर्य मोठ्या प्रमाणावर खचत आहे. सामाजिक न्याय तर प्रतिदिन चिरडला जात आहे. हा विकास आहे की विनाश? असा सवालही राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.

राहुल गांधी आणि विरोधी पक्षांनी रोजगाराच्या मुद्द्यावरुन नेहमीच केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे देशातील अर्थव्यवस्था एक गंभीर मुद्दा बनला आहे. या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष केंद्र सरकारवर जोरदार टीका करत आहेत. विशेष असे की रोजगाराचा मुद्दा विरोधक आणि सत्ताधारी दोघांच्याही अजेंड्यावर आहे. बिहार विधानसभा निवडणूकीत तेजस्वी यादव यांनी 10 लाख नोकऱ्यांचे अश्वासन दिले होते. तर त्यावर मात करण्यासाठी भाजपने 19 लाख नोकऱ्या देण्याचे अश्वासन दिले होते. (हेही वाचा, A Promised Land: बराक ओबामा यांनी सोनिया गांधी, मनमोहन सिंह, राहुल गांधी यांच्याबाबत काय म्हटले? आपल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ व्यक्त केले निरीक्षण)

आरबीआयने लक्ष्मी विलास बँकेवर नुकतेच निर्बंध घातले. यावरुनच इशारा देत राहुल गांधी यांनी इशारा दिला आहे. सरकारने लक्ष्मी विकाल बँकेवर एक महिन्यापर्यंत निर्बंध घातले आहेत. या माध्यमातून बँकेने खातेधारकांना अधिकाधिक 25,000 रुपये काढणयापर्यंतच मर्यादा ठेवली आहे.