Cinema Hall Guidelines: सिनेमागृह 100 टक्के क्षमतेने सुरु होणार, गाईडलाईन्स जारी

त्याचे काटेकोरपणे पालन करणे हे थिएटर मालकांना तसेच तेथे येणा-या प्रेक्षकांना बंधनकारक असणार आहे.

7D Theatre (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन भारतातील सिनेमागृहे (Cinema Theatres) पूर्णपणे बंद होती. मात्र अनलॉकच्या टप्प्यात ती 50% क्षमतेने सुरु करण्यात आली. मात्र यात प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून आता कोरोनाची लस आल्यानंतर देशातील अनेक गोष्टी पूर्वपदावर येण्याच्या तयारीत आहेत. त्यात आता भारतातील सिनेमागृहे 100% क्षमतेने सुरु होणार असे सांगण्यात येत आहे. मात्र त्यासाठी सरकारकडून काही गाईडलाईन्स (Guidelines) देण्यात आल्या आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करणे हे थिएटर मालकांना तसेच तेथे येणा-या प्रेक्षकांना बंधनकारक असणार आहे.

माहिती प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या एसओपीअंतर्गत निर्जंतुकीकरण आणि कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे. तसेच लोकांना सिनेमागृहाच्या आतमध्ये असलेल्या स्टॉलवरून पदार्थ खरेदी करता येतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. काही निर्बंध अजूनही घातलेले आहेत, कारण आता कोविड संपुष्टात येण्याच्या मार्गावर असला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे.हेदेखील वाचा- Guidelines for OTT Platforms: ओटीटी, डिजिटल प्रसारमाध्यमांसाठी लवकरच नियमावली, 'तांडव' वादानंतर केंद्र सरकार कारवाईच्या विचारात- प्रकाश जावडेकर

सिनेमागृहे 100% क्षमतेने चालविण्यासाठी गाईडलाईन्स

तसेच तिकिट बुकिंग पेक्षा ऑनलाईन बुकिंगला जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्यामुळे लोकांनी संपर्कात येण्याचे टाळता येईल. तरीही तिकीट खिडकीवर तिकीट विक्री चालू राहील आणि विक्री काउंटरवर गर्दी होऊ नये म्हणून आगाऊ बुकिंग करण्यासाठीही परवानगी देण्यात येईल.