Bihar Shocker: गांजासाठी 50 रुपये देण्यास नकार दिल्याने व्यक्तीने मित्राला भोकसले
हत्या करण्यामागील कारण ऐवढेच होते की, त्याला मित्राने गांजासाठी 50 रुपये देण्यास नकार दिला होता.
Bihar Shocker: एका व्यक्तीने कथित रुपात आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्या करण्यामागील कारण ऐवढेच होते की, त्याला मित्राने गांजासाठी 50 रुपये देण्यास नकार दिला होता. प्रिंस कुमार असे आरोपीचे नाव असून त्याने तिचा मित्र प्रदीप कुमार याच्याकडून गांजा खरेदीसाठी पैसे मागितले होते. मात्र त्याने ते देण्यास नकार दिल्याने प्रिंस संतप्त होत त्याला भोकसले. या प्रकरणी त्याचा मृत्यू झाला आहे.(Train Accident: तेलंगणामध्ये पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचला महिलेचा जीव, घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
बिहार मधील पटना येथील नौबतपुर थाना क्षेत्रातील पाली गावात ही घटना घडली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार पीडित व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याचा मृत्यू झाला. नौबतपुर पोलिस स्थानकाचे एसएचओ सम्राट दीपक कुमार याने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, एका शुल्लक वादानंतर आरोपी प्रिंस कुमारने प्रदीपवर चाकू हल्ला केला आणि तेथून पळ काढला. त्यांनी पुढे असे म्हटले की, आरोपी नशेच्या आहारी गेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याचा सुद्धा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.(Bihar Murder: धक्कादायक! पाचशे रुपयाच्या वादातून थोरल्याकडून धाकट्या भावाची हत्या)
पैशांच्या वादावरुन हत्या करण्यात आल्याची घटना यापूर्वी जुलै महिन्याच्या सुरुवातीला मध्य प्रदेशात घडली होती. दारुचे बिल भरण्याच्या वादावरुन 32 वर्षीय एका मुलाने 5 जुलै रोजी आपल्या मित्राची कुऱ्हाडीने हत्या केली होती. ही घटना भोपाळ मधील नजीराबाद येथील आहे. तसेच आणखी एका घटनेत एका व्यक्तीने आपल्या मित्राला तंबाखू खरेदी करण्यास नकार दिल्याने तिच्यावर चाकू हल्ला करत हत्या केली होती.