Ayodhya: दुर्गापूजेवेळी जोरदार गोळीबार, एका व्यक्तीचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी
हा प्रकार अयोध्येतील फैजाबाद परिसरात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Ayodhya: अयोध्या येथे दुर्गापुजेवेळी करण्यात आलेल्या जोरदार गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार अयोध्येतील फैजाबाद परिसरात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एसएसपी अयोध्या शैलेश पांडे यांनी असे म्हटले की, दोन अज्ञात व्यक्ती एका बाइकवरुन नील गोदाम पुजा मंडळाच्या येथे आले. त्याचवेळी त्यांनी अचानक गोळीबार सुरु केला असता मंजित यादव या व्यक्तीचा घटनास्थळीच गोळी लागून मृत्यू झाला.(गाझियाबाद येथे Bhatia Modh Flyover बस कोसळून भीषण अपघात, 2 दुचाकी अडकल्या; 3 जण जखमी)
मनजित यादव याच्या बाजूला बसलेल्या दोन अल्पवयीन मुली आणि एका मुलगा यामध्ये गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दोघांना लखनऊच्या केजीएमयू ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.(Four Girls Drown in Dhanavan River: अंघोळीसाठी गेलेल्या 4 मुलींचा नदीत बुडून मृत्यू, बिहारच्या नालंदा येथील घटना)
Tweet:
बाइकवरुन आलेल्या व्यक्तींनी गोळीबार सुरु केला असता मंडपातील लोकांमध्ये खळबळ उडाली. पण गोळीबार केल्यानंतर बाइकवरील व्यक्तींनी तेथून पळ काढला. दरम्यानस एडीजी लखनौ धोन एसएन सबत यांनी असे म्हटले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले की, वैयक्तिक वैर असल्याच्या कारणास्तव हा गोळीबार केला गेला आहे. पांडे यांनी असे म्हटले की, मृत व्यक्तीचा गोळीबार होण्याच्या आदल्या दिवशी एका व्यक्तीसोबत भांडण झाले आहे. या प्रकरणी लवकरच तपास व्हावा यासाठी चार टीमची नेमणूक करण्यात आली आहे.