Delhi Shocker: दिल्लीतील शकरपूरमध्ये शाळेबाहेर विद्यार्थ्यांमध्ये वाद; 14 वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या
दिल्लीतील शकरपूर (Shakarpur) भागात एका 14 वर्षीय विद्यार्थ्याची शाळेबाहेर चाकूने भोसकून हत्या (Murder) करण्यात आली. पीडित विद्यार्थी आणि इतर काही विद्यार्थ्यांमध्ये शुक्रवारी झालेल्या भांडणानंतर ही कथित घटना घडली.
Delhi Shocker: पूर्व दिल्लीतील शकरपूर (Shakarpur) भागात एका 14 वर्षीय विद्यार्थ्याची शाळेबाहेर चाकूने भोसकून हत्या (Murder) करण्यात आली. पीडित विद्यार्थी आणि इतर काही विद्यार्थ्यांमध्ये शुक्रवारी झालेल्या भांडणानंतर ही कथित घटना घडली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, एका विद्यार्थ्याने त्याच्या तीन-चार मित्रांसह शाळेच्या गेटबाहेर पीडित विद्यार्थ्यावर हल्ला केला. हल्लेखोरांपैकी एकाने पीडित मुलाच्या उजव्या मांडीवर चाकूने वार केले, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
प्राप्त माहितीनुसार, एका विद्यार्थ्याने त्याच्या तीन-चार मित्रांसह शाळेच्या मुख्य गेटबाहेर किशोरवयीन मुलावर हल्ला केला. त्यानंतर या भांडणाला हिंसक वळण लागले. हल्लेखोरांपैकी एकाने किशोरच्या उजव्या मांडीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली. (हेही वाचा -UP Shocking: पोटच्या मुलीची हत्या करून 'दृश्यम' स्टाईलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, पित्यासह सावत्र आईलाही अटक)
सात संशयितांना घेण्यात आले ताब्यात -
गुन्हेगारांना पकडण्यासाठी शकरपूर पोलिस ठाण्याचे अमली पदार्थ विरोधी पथकासह 'विशेष कर्मचाऱ्यांचे' पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची हत्येमागची भूमिका आणि हेतू तपासण्यात येत आहे. मृत विद्यार्थ्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. (हे देखील वाचा- Tamil Nadu: काय सांगता? 17 वर्षांच्या मुलाला पळवून घेऊन गेली 19 वर्षांची मुलगी; लैंगिक शोषण करून लग्न केल्याचा आरोप; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल)
आरोपींविरोधात गुन्हा दाखल -
पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पोलिसांच्या एका पथकाला आरोपीला अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांनी या घटनेत सात जणांना ताब्यात घेतले असून त्यात पाच अल्पवयीन आणि 19 आणि 31 वयोगटातील दोन जणांचा समावेश आहे. याप्रकरणी शकरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)