7th Pay Commission: तरुणांसाठी खुशखबर; सातव्या वेतन आयोगानुसार NHAI मध्ये नोकरभरती; 2 लाखापर्यंत पगार मिळण्याची शक्यता
याद्वारे एकूण 170 पदे भरली जाणार आहेत
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) व्यवस्थापक (तांत्रिक) व उप महाव्यवस्थापक (DGM) पदे भरण्यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. याद्वारे एकूण 170 पदे भरली जाणार आहेत. यातील 124 जागांपैकी 84 पदे पदोन्नती आधारावर, तर उर्वरित 40 जागा प्रतिनियुक्ती तत्वावर भरल्या जातील. इतर 46 पदे व्यवस्थापक पदासाठी असणार आहेत. भरती प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर, निवडलेल्या उमेदवाराला गॅजेटेड रँक गट अ मधील पातळी 12 या पदावर नियुक्त केले जाईल. एनएचएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर - nhai.gov.in वर लॉग इन करूनच अर्ज ऑनलाईन पाठविला जाऊ शकतो.
ऑनलाईन अर्ज प्राप्त करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2020 आहे. ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटआउटची पावती प्राप्त करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2020 आहे.
निवड झाल्यानंतर अर्जदाराला महागाई भत्ता (डीए), ट्रॅव्हलिंग अलाऊंस (टीए), गृह भाडे भत्ता (एचआरए) इत्यादीप्रमाणे, 78,800 ते 2,09,200 रुपये वेतन दिले जाईल. महत्वाचे म्हणजे हे वेतन सातवा वेतन आयोगानुसार असणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 78,800 रुपये प्रारंभिक पगार आणि सातव्या वेतन आयोगाने शिफारस केलेले व केंद्राने मंजूर केलेले विविध भत्ते मिळतील. एनएचएआयने सूचित केलेल्या रिक्त पदांसाठी पात्रता निकष पाहण्यासाठी आपण nhai.gov.in वर लॉग इन करू शकता. (हेही वाचा: 12वी उत्तीर्णांसाठी महाराष्ट्र सरकार मध्ये 7000 पदांसाठी नोकरीची संधी; mahasecurity.gov.in वर करा ऑनलाईन अर्ज)
या पदांसाठीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पात्रता –
> सरकारच्या सातव्या वेतन आयोगाच्या पगाराच्या या नोकरीसाठी अर्ज करणारे अर्जदार, मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगचे पदवीधर असावेत.
> महामार्ग, रस्ता आणि पुलाशी संबंधित पायाभूत सुविधांच्या क्षेत्राच्या अंमलबजावणीचा, अर्जदारास कमीतकमी सहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
> अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 56 असावे.
दरम्यान, ऑनलाईन अर्ज केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या अर्जाचा प्रिंटआउटही पाठवावी लागेल. ऑनलाईन फॉर्मची प्रिंटआउट पाठविण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2020 आहे.