7th Pay Commission: DA आणि DR Arrears बद्दल सोशल मीडियात व्हायरल होणारे पत्रक खोटे, अर्थमंत्रालयाने दिले 'हे' स्पष्टीकरण
त्यामध्ये केंद्र सरकारच्या 60 लाख कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
7th Pay Commission Update: केंद्र सरकारने आज महागाई भत्ता आणि त्याच्या थकबाकी संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक बोलावली होती. त्यामध्ये केंद्र सरकारच्या 60 लाख कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अशातच सोशल मीडियात डीए आणि डीए एरियर्सबद्दल एक पत्रक तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये डीए आणि एरियर्स येत्या 1 जुलै पासून देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र आता व्हायरल झालेले हे पत्रक खोटे असल्याचे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
अर्थमंत्रालयाने असे म्हटले की, सोशल मीडियात व्हायरल झालेल्या पत्रात डीए आणि डीआर एरियर्स 1 जुलै पासून दिले जाणार असल्याचा दावा केला आहे. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा आहे. अशा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही असे अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.(7th Pay Commission: DA आणि DR Arrears बद्दल आज निर्णय होण्याची शक्यता)
Tweet:
दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले डीए आणि डीआर हा केंद्र सरकार जुलै महिन्यापासून वाढवला जाऊ शकतो अशी संसदेत घोषणा करण्यात आली आहे. रिपोर्ट्समध्ये असे ही म्हटले गेले की, राहिलेला डीए आणि डीआर हा येत्या 1 जुलै 2021 पासून लागू केला जाऊ शकतो. मात्र आता यावर अर्थमंत्रालयाने प्रतिक्रिया देत ही खोटी माहिती असल्याचे म्हटले आहे.