7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2022 मध्ये मिळू शकते खुशखबर! वेतनात भरघोस होणार वाढ

कारण डिसेंबर 2021 च्या अखेर पर्यंत काही शासकीय विभागात पदोन्नती होणार आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

7th Pay Commission: सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना येत्या काळात खुशखबर मिळू शकते. कारण डिसेंबर 2021 च्या अखेर पर्यंत काही शासकीय विभागात पदोन्नती होणार आहे. तर अर्थसंकल्प 2022 पूर्वी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर मध्ये सुद्धा वाढ करुन दिली जाऊ शकते. जर असे झाल्यास शासकीय कर्मचाऱ्यांचे कमीत कमी वेतन सुद्धा वाढले जाणार आहे.(Garib Kalyan Anna Yojana: मोदी सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत वाढवली, मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय)

डीएनच्या एका रिपोर्ट्सनुसार, जानेवारी 2022 मध्ये महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच डीए 31 टक्क्यांवरुन 34 टक्के होणार आहे. AICPI च्या आकडेवारीनुसार सध्या सप्टेंबर 2021 पर्यंतचे आकडे उपलब्ध आहेत. त्यानुसार महागाई भत्ता 32.81 टक्के आहे. तर जून 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार जुलै 2021 मध्ये डीए सुद्धा 31 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच पुढील आकडेवारीनुसार, महागाई भत्त्याची गणना केली जाईल आणि यामध्ये भरघोस वाढ होण्याची अपेक्षा आहे.

एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2021 पर्यंत महागाई भत्ता 33 टक्के आहे. म्हणजे यामध्ये 2 टक्क्यांनी वाढ झाली. दरम्यान, ऑक्टोंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आकडे समोर आलेले नाहीत. याच्या 1 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. जर सीपीआयचे आकडा डिसेंबर 2021 पर्यंत 125 वर असल्यास महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होणे शक्य आहे. म्हणजेच एकण 3 टक्के वाढून 34 टक्के होईल. याचे पेमेंट जानेवारी 2022 मध्ये केले जाईल. याच कारणामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुद्धा वाढ होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार जानेवारी 2022 च्या सुरुवातीला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हाउस रेंट अलाउंस (HRA) मध्ये सुद्धा वाढ करु शकते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif