7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना जर 7 वे वेतन आयोग किंवा 7 व्या सीपीसी नुसार सणासुदीच्या काळात खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना जर 7 वे वेतन आयोग किंवा 7 व्या सीपीसी नुसार सणासुदीच्या काळात खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 3 टक्क्यांनी वाढ होऊ शकते असे काही रिपोर्ट्समधून समोर आले आहे. जर असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार त्यांच्या वेतनात ही वाढ होणार आहे.(Junk Food मुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या, FSSAI ने घेतला 'हा' मोठा निर्णय)
7 वे वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA वर्षातून दोन वेळा वाढला जातो. मात्र यंदाच्या वर्षात DA फक्त एकदाच वाढवला गेला आहे. केंद्र सरकारकडून या वर्षात जानेवारी महिन्यात DA हा 4 टक्क्यांनी वाढवला आहे. तो 1 जुलै पासून दिसणार असल्याचे सांगितले होते. केंद्र सरकारकडून दुसरा DA सुद्धा दिला जातो पण अद्याप त्याची घोषणा करण्यात आलेली नाही.
केंद्र सरकारने अद्याप दुसऱ्या DA च्या वाढीबद्दल काही सांगितले नसले तरीही रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जाते की, या महिन्याच्या अखेर पर्यंत ते होऊ शकते. पण आता 20 दिवस उलटून गेले आहे तरीही कोणताही घोषणा करण्यात आलेली नाही. काही रिपोर्ट्समध्ये असे बोलले जात आहे की, दसरा किंवा दिवाळी दरम्यान DA हा 3 टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो.
सरकारने या रिपोर्टला नाकारले ही नाही ना त्याबद्दल अधिकृत काही सांगितले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA नुसार बेसिक वेतन 28 टक्क्यांनी दिले जाते. मात्र 3 टक्क्यांनी DA मध्ये वाढ झाल्यास त्यांना बेसिक पगार 31 टक्क्यांनी येणार आहे.(Aadhaar Card: मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसल्यास 'असे' डाऊनलोड करा आधार कार्ड; फॉलो करा 'या' स्टेप्स)
जर DA वाढल्यानंतर 31 टक्क्यांनी बेसिक पगार किती येईल?
(व्यक्तिचा बेसिक पगार 18 हजार असेल)
-नवा DA (31%) 5580 रुपये प्रति महिना
-आधीचा DA (28%) 5040 रुपये प्रति महिना
-दोघांमधील फरक: 5580-5040= 540 प्रति महिना
-वार्षिक पगारात वाढ 540X12= 6480
व्यक्तीचा बेसिक पगार 2,25,000:
-नवा DA (31%) 69,750 रुपये प्रति महिना
-आधीचा DA (28%) 63,000 रुपये प्रति महिना
-दोघांमधील फरक: 69,750-63,000= 6750 रुपये
-वार्षिक पगारात वाढ 6750X12= 81,000
कर्मचारी संघाच्या मते सरकार 3 टक्क्यांनी डीए मध्ये वाढ करु शकते. एसआयसीपीआय (AICPI) च्या आकडेवारीनुसार जून 2021 चा इंडेक्स 1.1 गुणांनी वाढून 121.7 वर पोहचला आहे. अशातच जून 2021 मध्ये महागाई भत्ता आणि डीआर मध्ये 3 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. कर्मचारी संघाचे असे म्हणणे आहे की, जर महागाई भत्त्यात वाढ झाल्यास सरकारने जुलै पासून ते आतापर्यंतचे पेमेंट्स केले पाहिजे. कारण दीड वर्षात एरियर बद्दल काहीच बोलले गेले नाही