Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 21, 2025
ताज्या बातम्या
8 minutes ago

पालघर येथे पावसादरम्यान वीज कोसळून 2 ठार 6 जखमी; 6 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Darshana Pawar | Sep 06, 2020 11:33 PM IST
A+
A-
06 Sep, 23:32 (IST)

पालघर जिल्ह्यात आज पावसाने हजेरी लावली. पावसादरम्यान वीज कोसळून 2 ठार तर 6 जण जखमी झाले.

06 Sep, 23:04 (IST)

पुणे येथील बालेवाडी जवळ झालेल्या कार अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

06 Sep, 22:44 (IST)

तामिळनाडू राज्यातील कोयंम्बतूर शहरात असलेल्या चेट्टी स्ट्रीट परिसरात एक बहुमजली इमारत कोसळली. मदत आणि बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत दघांची सुटका करण्यात आली आहे.

06 Sep, 22:25 (IST)

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुलाखत आकाशवाणीवरील दिलखुलास कार्यक्रमात उद्या प्रसारीत होणार आहे. ही मुलाखत अनुक्रमे सोमवारी आणि मुंगवळवारी प्रसारीत होणार आहे.‘कोरोना: कालावधी, क्वारंटाईनचे प्रकार व काळजी’ यावर या मुलाखतीत भाष्य केले जाणार आहे.

06 Sep, 22:12 (IST)

हिमाचल प्रदेश सरकारने कंगना रनौत हिला सुरक्षा दिल्याचे वृत्त आहे. कंगनाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन हिमाचल प्रदेश सरकारने ही सुरक्षा दिली आहे. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिल्याचे समजते.

06 Sep, 22:02 (IST)

जम्मू आणि काश्मीर पोलिस व  स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) आणि आर्मी यांनी संयुक्त कारवाईत डोडाच्या चिराला वनक्षेत्रात एका मोकळ्या जागेचा भडका उडवून एक बंदूक आणि 54 Rounds जप्त केले आहेत.

06 Sep, 21:50 (IST)

उद्या सकाळी 10. 30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  राष्ट्रपती रामनाथ कोविंंद यांंच्यासह, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020  संदर्भातील परिषदेत उपस्थिती लावणार आहेत. यावेळी देशातील विद्यापीठांचे राज्यपाल आणि कुलगुरू उपस्थित असतील, या परिषदेच्या चर्चेमुळे भारताला ज्ञानाचे केंद्र बनविण्याच्या प्रयत्नांना बळकटी येईल अशा आशयाचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी केले आहे.

06 Sep, 21:25 (IST)

संपूर्ण राज्यासह राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरातही कोरोना व्हायरस संकटाचे प्रमाण नियंत्रणात कायम आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहरात आज दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 1,910 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 37 जणांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात मुंबई शहरात उपचार घेऊन बरे झालेल्या 911 जणांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आली.

मुंबई शहारातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 1,55,622 इतकी झाली आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या 23,930, डिस्चार्ज मिळालेल्या 1,23,478 आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 7,866 जणांचाही समावेश आहे.

06 Sep, 21:03 (IST)

महाराष्ट्रात आज 23,350 नवे कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत, ही आजवरची विक्रमी वाढ असुन सध्या राज्यातील कोरोनाबाधितांंचा आकडा 9,07,212 वर पोहचला आहे. कालच्या दिवसात 7,826 जणांंनी कोरोनावर मात केली असुन एकुण रिकव्हरी झालेल्यांंची संख्या 6,44,400 इतकी आहे. एका दिवसात कोरोनामुळे नवे 328 बळी जाउन मृतांंची संंख्या 26604 इतकी झाली आहे. राज्यात 2,35,857 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

06 Sep, 20:55 (IST)

दिल्लीत कोरोनाचे आणखी 3256 रुग्ण आढळल्याने आकडा 1,91,449 वर पोहचला आहे.

Load More

देशातील भुकंपाचे सत्र सुरुच आहे. देशातील विविध भागात भुकंपाच्या घटना अलिकडेच सातत्याने कानावर पडत आहेत. आज सकाळी 7.30 वाजता अरुणाचल प्रदेश मधील तवंग येथे 3.4 मॅग्निट्युटचा भुकंपाचा धक्का बसला. अशी माहिती National Center for Seismology(NCS)ने दिली आहे.

दरम्यान आज आंध्रप्रदेश मधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अंतरवेदीच्या श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरातील एका रथात काल रात्री आग लागली. पहाटे 3 वाजेपर्यंत आग विझवण्यात आली असून यात दुसरी कोणतीही वित्तहानी झाली नाही. तसंच जीवितहानीही टळली. मात्र आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्याचा तपास अद्याप सुरु आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

देशातील कोरोना व्हायरसचे संकट कायम असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सध्या देशातील रुग्णसंख्येने 40 लाखांचा टप्पा पार केला असून मृतांचा आकडा 70 हजारांच्या जवळपास पोहचत आहे. दिवसागणित रुग्णसंख्येत 80 हजारहून अधिक रुग्णांची मोठी भर पडत आहे.


Show Full Article Share Now