हिमाचल प्रदेश: कुल्लू जिल्ह्यात 60 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीचा मृतदेह गोठलेल्या अवस्थेत आढळला; 6 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सह जोडलेले रहा...
हिमाचल प्रदेश: कुल्लू जिल्ह्यात 60 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीचा मृतदेह गोठलेल्या अवस्थेत आढळला आहे. 3 फेब्रुवारी रोजी तो घरातून बाहेर पडला होता, त्यानंतर तो घरी परतला नाही. त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला असता, 5 फेब्रुवारीला त्याचा मृतदेह गोठलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनानंतर तो कुटुंबात परत देण्यात येईल.
हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणची रस्ते वाहतूक बंद झाली आहे. यामुळे रस्त्यांवर बर्फ साचल्यामुळे रस्त्यांवरुन चालताना घसरणे, त्याचबरोबर अनेक अडचणींचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे.
राज्यात आज 2,768 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 25 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 1,739 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळा समोर Nadaprabhu Kempegowda चा 108 फूट उंच कांस्य पुतळा पुढील वर्षी पूर्ण होईल, असं कर्नाटक उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथनारायण यांनी सांगितलं.
कृषी कायद्यावरुन गेले 70 दिवस सुरु असलेलं शेतकरी आंदोलन आता चांगलंच पेटलं आहे. आज आंदोलक शेतकऱ्यांनी चक्का जाम ची हाक दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांवर आंदोलन केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. वॉटर कॅनन्स तयार ठेवण्यात आले आहेत. देशभर चालणारं चक्का जाम आंदोलन आज 12 ते 3 या वेळेत होणार आहे. मात्र यातून उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंड ही राज्यं वगळण्यात आली आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारचा या आंदोलनाला पाठिंबा आहे.
मुंबईतील मानखुर्द येथील गोडाऊनला काल लागलेली आग अद्याप धुमसतीच आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने चिंता अधिक वाढत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावरील टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांच्या नोटीसी, समन्स यांना मनसेकडून कोणतीही उत्तरे देण्यात आली नाहीत. अखेर कोर्टाने वॉरंट जारी करत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आज सकाळी 10.30 वाजता सीबीडी येथील कोर्टात दाखल होणार आहेत.