मुंबई: भरधाव होंडा सिटी कारच्या धडकेत 4 ठार, 4 जखमी, क्रॉफर्ड मार्केट येथील घटना; 31 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबई, पुणे सह देशापरदेशातील ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी ते कोरोना व्हायरस अपडेट्स जाणून घेण्यासाठी मराठी लेटेस्टलीला नक्की भेट द्या.

01 Sept, 05:10 (IST)

मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केट येथे भरधाव होंडा सिटी कारने दिलेल्या धडकेत चार जणांचा मृत्यू तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना आज रात्री 9 च्या सुमारास घडली. जखमींवर मुंबई येथील जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तात पाच जण जखमी झाल्याचे म्हटले होते. मात्र, सुधारीत माहितीनुसार या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. (सविस्तर वाचा)

01 Sept, 04:46 (IST)

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर जगभरातून दु:ख व्यक्त केले जात आहे. रशीयाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांना शोकसंदश लिहून प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

01 Sept, 04:28 (IST)

मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केट परिसरात एका भरधाव कारने दिलेल्या धडकेत पाच जण जखमी झाले. ही घटना आज रात्री 9 च्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

01 Sept, 04:12 (IST)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील 7 कट्टर शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला. या वेळी अनिल शिदोरे, अभिजीत पानसे यांच्यासह अनेक मनसे बदाधिकारी उपस्थित होते.

01 Sept, 04:04 (IST)

राज्यातील युती सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपने ड्रग्ज, क्रिकेट, सट्टेबाजी आणि बेकायदेशिररित्या पैशांचा वापर केला. मी मुख्यमंत्री असताना ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई केली. मी चित्रपट निर्मिती क्षेत्रात कार्यरत असताना मला ड्रग्ज माफियांबाबत माहिती नव्हती, असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि डेडीएस नेते एच डी कुमार स्वामी यांनी म्हटले आहे.

01 Sept, 03:47 (IST)

जपानची डोनर एजन्सी JICA ने भारत सरकारबरोबर करार केला असून, त्याअंतर्गत भारतातील कोविड-19 साथीच्या आजाराविरुद्ध लढा देण्यासाठी  3,500 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

01 Sept, 03:21 (IST)

JEE/ NEET परीक्षा देण्यास जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पीरक्षेच्या दिवशी अधिकृत तिकीटांसह प्रवास करण्यास स्थानिक रेल्वे सेवेतून (लोकल रेल्वे) प्रवास करण्यास मुभा आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे.

 

<blockquote class="twitter-tweet"><p lang="en" dir="ltr">Supporting students appearing for NEET &amp; JEE exams, Railways has permitted them, and their guardians to travel by special suburban services in Mumbai on exam days. General passengers are requested not to commute: Union Railway Minister Piyush Goyal <a href="https://t.co/P4b5mvI28P">pic.twitter.com/P4b5mvI28P</a></p>&mdash; ANI (@ANI) <a href="https://twitter.com/ANI/status/1300464941481078784?ref_src=twsrc%5Etfw">August 31, 2020</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

01 Sept, 02:55 (IST)

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

01 Sept, 02:51 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, संजय राऊत, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावरील गणपतीचे दर्शन आज सहपरीवार घेतले. या वेळी रश्मी ठाकरे, प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, सदानंद सुळे यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते.

01 Sept, 02:36 (IST)

श्री प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे गेल्या 60 वर्षांतील एका यशस्वी राजकीय जीवनाची अखेर झाली आहे. ते एक मुत्सद्दी, व्यासंगी आणि प्रगल्भ राजकारणी होते. कॉंग्रेसमध्ये किंवा सरकारमध्ये एखादा पेचप्रसंग निर्माण झाला, की तो सोडवण्यासाठी त्यांचीचं मदत होई. माझ्यावर त्यांचे विशेष प्रेम आणि आपुलकी होती. माझी त्यांना विनम्र आदरांजली, अशा शब्दांत नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी प्रणव मुखर्जी यांच्याप्रति आपल्या सद्भावना व्यक्त केल्या आहेत. 

 

 

 

01 Sept, 02:31 (IST)

राज्यात आज 11852 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11158 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 573559 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 194056 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.37% झाले आहे.

01 Sept, 02:14 (IST)

मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 1,179 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

01 Sept, 02:12 (IST)

लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

 

01 Sept, 02:06 (IST)

पुणे शहरात आज 876 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

 

01 Sept, 01:43 (IST)

माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी हे भारतीय राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. आपल्या प्रदिर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत त्या पदाचा मान आणि सन्मान वाढविला. प्रणवदांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक पर्व संपले, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

01 Sept, 01:14 (IST)

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे सरकारकडून 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

 

01 Sept, 24:33 (IST)

भारतरत्न प्रणव मुखर्जी हे एक आदरणीय सहकारी, सहकारी खासदार आणि प्रिय मित्र होते. आपल्यावर सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या ते पार पाडत असतं. भारताने एक प्रख्यात राजकारणी गमावला आहे, असा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

01 Sept, 24:19 (IST)

फरार व्यावसायिका विजय मल्ल्याला 5 ऑक्टोबर रोजी उपस्थित रहाण्याचे सुप्रीम कोर्टाचा निर्देश दिले आहेत. तसेच त्या दिवशी कोर्टरूममध्ये आपली उपस्थिती सुनिश्चित करण्याचे आदेश गृह मंत्रालयाला दिले आहेत.

31 Aug, 23:51 (IST)

राहुल गांधी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

31 Aug, 23:43 (IST)

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सद्भावना व्यक्त केल्या.

Read more


भारतामध्ये कोरोनाबाधितांच्या रूग्णांनी 36 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात पुन्हा दिवसाला झपाट्याने रूग्णसंख्या वाढत असताना आता जेईई मेन्स, नीट 2020 सारख्या प्रवेशपरीक्षा, महाराष्ट्र सीईटी सोबतच विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरक्षितपणे पार पाडण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहेत. महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठ परीक्षांच्या रूपरेषेची आज माहिती दिली जाणार आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तशी माहिती दिली आहेत.

दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिल आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांच्याविरूद्धच्या कोर्टाच्या अवमान प्रकरणी निकालाकडे ही सार्‍यांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी दोषी ठरवल्यानंतर आता शिक्षेची सुनावणी केली जाईल. दरम्यान याप्रकरणी त्यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

केंद्र सरकारने 30 सप्टेंबर पर्यंत अनलॉक 4 घोषित केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य सरकार काय नियमावली जाहीर करते याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. मंदिरं, जीम उघडणार का? ई पासच्या नियमामधून सुटका होणार का? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now