अंदमान निकोबारमध्ये आज कोरोनाच्या 23 प्रकरणांची नोंद झाली असून, एकूण प्रकाराने 3,104 झाली आहेत. यामध्ये 45 रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या 473 सक्रीय रुग्ण आहेत.
अंदमान निकोबारमध्ये आज कोरोनाच्या 23 प्रकरणांची नोंद; 30 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी संपूर्ण देशवासिय ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात तो पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ‘मन की बात’ (Mann Ki Baat) हा कार्यक्रम आज होणार आहे. या रेडिओ कार्यक्रमाद्वारे ते गेली कित्येक वर्षे देशवासियांशी संवाद साधत आहे. आज या कार्यक्रमाचा 68 वा भाग प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात देशाची सद्य परिस्थिती, लॉकडाऊन (Lockdown), अनलॉक (Unlock), आर्थिक परिस्थिती या सर्वांवर भाष्य करण्याची शक्यता आहे. तसेच हा लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु असून याबाबत काय महत्त्वाची घोषणा करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना व्हायरसशी लढत असलेल्या देशवासियांना धीर देण्यासाठी पंतप्रधान मोदी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे संपूर्ण देशात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून गेल्या चार दशकांच्या तुलनेत देशात यंदाच्या ऑगस्ट महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातही या महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान महाराष्ट्रात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7,64,281 वर पोहचली आहे. तसेच काल दिवसभरात तब्बल 328 जणांंची कोरोनाच्या विरुद्ध झुंंज अपयशी ठरली परिणामी राज्यातील कोरोना बळींंचा आकडा (Coronavirus Deaths) 24,103 इतका झाला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)