दिल्लीच्या AIIMS हॉस्पिटल मध्ये Brain Tumor Surgery होत असताना 24 वर्षांची रूग्ण पूर्ण वेळ करत होती हनुमान चालीसा चं पठण

Department of Neurosurgery, Dr Deepak Gupta यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला लोकल अनेस्थेशिया दिला होता तसेच पेन किलर्स देण्यात आले होते

The 24-year-old woman who underwent surgery at AIIMS

दिल्लीच्या (Delhi)  एम्स रूग्णालयामध्ये (AIIMS Hospital) 24 वर्षीय तरूणी ब्रेन ट्युमर वरील एक जटील शस्त्रक्रिया पार पाडत असताना हनुमान चालीसा म्हणत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. दरम्यान ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. ANI वृत्तसंस्थेसोबत बोलताना दिलेल्या माहितीनुसार, या शस्त्रक्रियेदरम्यान सहभागी Dr Deepak Gupta यांनि दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन थिएटर मध्ये 3 तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. त्यामध्ये ही मुलगी पूर्ण शुद्धीमध्ये होती आणि ऑपरेशनचा पूर्ण वेळ ती हनुमान चालीसाचं पठण करत होती. Brain Surgery दरम्यान रूग्णाच 3 तास हनुमान चालीसा पठण,डॉक्टरांनीच दिला होता सल्ला !

Department of Neurosurgery, Dr Deepak Gupta यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला लोकल अनेस्थेशिया दिला होता तसेच पेन किलर्स देण्यात आले होते. या तरूणीला भविष्यात शिक्षिका होण्याची इच्छा आहे.

एम्स मध्ये अशाप्रकारे रूग्णांना शुद्धीमध्ये ठेवून अनेक कठीण शस्त्रक्रिया यापूर्वी देखील झाल्या आहे. मेंदू सारख्या नाजूक अवयवावर शस्त्रक्रिया करताना रूग्णाला शुद्धीमध्ये ठेवण्यामागे मेंदूला काही धोका तर नाही ना? हे बघितलं जातं. एम्सच्या माहितीनुसार, मागील 20 वर्षात अशा 500 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

प्रगत तंत्रज्ञानामुळे आता अशा शस्त्रक्रियांमधून लवकर डिस्चार्ज आणि रिकव्हरी होण्याची देखील शक्यता वाढली आहे. ज्या रूग्नांमध्ये eloquent areas (motor and speech areas) मध्ये ट्युमर असतो अशांना या शस्त्रक्रिया फायद्याच्या ठरतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif