पुण्यात आज 212 नव्या कोरोना रुग्णांची नोंद ; 22 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, भारत चीन तणाव, नेपाळने सुरु केलेली कारणाशिवायची उठाठेव, राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांसह स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगशी जोडलेले राहा.

23 Jun, 05:26 (IST)

पुण्यात आज 212 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. 

 

23 Jun, 04:56 (IST)

पुलवामाच्या बाटागुंडमध्ये डी/ 180 बटालियन सीआरपीएफ छावणीच्या जागेपासून काही अंतरावर एक मोठा आवाज ऐकू आला. यासंदर्भात केंद्रीय राखीव पोलिस दलाने माहिती दिली आहे.

23 Jun, 04:41 (IST)

जागतिक ऑलिंपिक दिन निमित्त उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

23 Jun, 04:25 (IST)

हरियाणामध्ये आज 390 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. हरियाणामध्ये आज 390 नवे कोरोना रुग्ण त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 11025 वर पोहोचली आहे.

 

 

 

23 Jun, 03:46 (IST)

पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडू हैदर अली, हरीस रौफ, शादाब खान यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती पीसीबीने दिली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

23 Jun, 03:13 (IST)

दिल्लीत आज 2,909 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोना रुग्णांचा आकडा 62 इतका झाला आहे.

 

23 Jun, 02:48 (IST)

मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 128 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे.

 

23 Jun, 02:29 (IST)

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज 3 हजार 721 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, 62 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या 1 लाख 35 हजार 796 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

23 Jun, 01:53 (IST)

गोव्यात आणखी 46 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 864 वर पोहचला आहे.

23 Jun, 01:45 (IST)

मणिपूर येथे आणखी 57 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 898 वर पोहचला  आहे.

23 Jun, 01:39 (IST)

जम्मू कश्मीर येथे आणखी 132 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा  6088 वर पोहचला आहे.

23 Jun, 01:30 (IST)

छत्तीसगढ येथे 3.6 रिश्टर स्केल भुकंपाचे धक्के जाणवले आहेत.

23 Jun, 01:16 (IST)

ओडिशा येथे जगन्नाथ रथयात्रेमुळे पुरी जिल्ह्यात आज रात्री 9 वाजल्यापासून ते 24 जूनच्या दुपारी 2 वाजेपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

23 Jun, 01:05 (IST)

तमिळनाडू येथे 2710 जणांना कोरोनाची लागण तर 37 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 62,087 वर पोहचला आहे.

23 Jun, 24:54 (IST)

जम्मू-कश्मीर येथे राजौरी मधील नौशेरा सेक्टर येथे पाकिस्तानकडून शस्त्रसंधींचे उल्लंघन करण्यात आले आहे.

23 Jun, 24:38 (IST)

गुजरात येथे गेल्या 24 तासात आणखी 563 कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर 21 जणांचा बळी गेला आहे.

23 Jun, 24:20 (IST)

कोरोना व्हायरसवरसंबंधित लसीबाबत अभ्यास सुरु असून ते जर मिळाल्यास 100 टक्के COVID19 पासून या संकटातून बाहेर येऊ असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

23 Jun, 24:06 (IST)

ओडिशा मधील कासीपुर परिसारातील रायगडा जिल्ह्यात 3.6 रिश्टर स्केलचे भुकंपाचे धक्के जाणवले आहेत.

22 Jun, 23:41 (IST)

तेलंगणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी गलवानच्या खोऱ्यातील संघर्षात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या परिवाराची भेट घेतली आहे.

22 Jun, 23:21 (IST)

सुप्रीम कोर्टाने जगन्नाथ रथयात्रेला परवानगी दिल्याने गृहमंत्री अमित शहा यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Read more


कोरोना व्हायरस आणि आर्थिक मंदी अशा संकटांना भारत तोंड देत आहे. कोरोनावर अद्यापही उपचार सापडला नाही. अवघे जगच उपचाराच्या प्रयत्नांत चाचपडते आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील अनेक देशांनी कोरोना व्हायरस संकटाला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन लागू केला आहे. प्रत्येक देश आपापल्या पातळीवर लढतो आहे. दरम्यान, असे असताना भारत-चीन संबध कमालीचे ताणले गेले आहेत.

लद्दाख प्रदेशातील गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी कुरापती केल्या. या वेळी झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले. काही जखमी झाले. चीनच्या या आगळीकीनंतर भारत सरकारने लष्कराला मोकळीक दिली आहे. त्यामुळे सीमेवर चीनच्या कुरापतीला रोखण्यासाठी भारतीय लष्कराला आता पूर्ण स्वातंत्र्य आहे. चीनच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने (सरकारी) भारताच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

देश कोरोना आणि चीन अशा दोन्ही समस्यांशी लढतो आहे. त्यासोबत महाराष्ट्रही कोरोना व्हायरस संकटाविरोधात लढतो आहे. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढते आहे. असे असले तरी कोरोना व्हायरस रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला हाही एक मोठा दिलासा आहे.

कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, भारत चीन तणाव, नेपाळने सुरु केलेली कारणाशिवायची उठाठेव, राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांसह स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगशी जोडलेले राहा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement