महाराष्ट्र: माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी महाडिकांसह दोघांसह गुन्हा दाखल ; 22 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचे 21 फेब्रुवारी रोजी पुण्यात लग्न झाले. या लग्नात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी महाडिक आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माझे निकटचे जेष्ठ स्नेही कोकण मतदार संघाचे माजी आमदार ,शिवसेना उपनेते, ठाणे शहराचे माजी महापौर,मा. अनंत तरे यांच्या निधनाची बातमी समजली. तरे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!, असे ट्वीट महाराष्ट्राचे उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. ट्वीट-
केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जुन्या धावपट्टीचे पुनर्बांधणीचे काम फेब्रुवारीच्या अखेरीस पूर्ण केले जाईल, अशी माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. ट्वीट-
मुंबईत मागील 24 तासांत 760 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 3,19,888 वर पोहोचली आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
केरळ ते कर्नाटक पर्यंतचे अनेक सीमा रस्ते बंद करण्याचा मुद्दा केंद्र सरकारच्या निदर्शनास आणला जाईल, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले आहेत. ट्वीट-
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून मुंबई पोलिसांनी 200 रुपये दंड आकारला आहे. तसेच दंड ठोठवल्यानंतर संबंधित व्यक्तीला मास्कदेखील दिला आहे. ट्वीट-
शिवसेना उपनेते,ठाण्याचे माजी महापौर,माजी आमदार,श्री आई एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांच्या दु:खद निधनाने ठाणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.भावपूर्ण श्रद्धांजली!ॐ शांती, असा आशायाचे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ट्वीट-
सातारा मध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. संचारबंदी रात्री 11 ते पहाटे 6 या वेळेत राहणार आहे. पण शाळा मात्र सुरू राहणार आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गाला देखील यामधून वगळण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, खामगाव, मलकापूर, चिखली आणि देऊळगाव राजा ही नगरपालिका क्षेत्रे कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकार्यांकडून देण्यात आली आहे.
Toolkit Case मध्ये पटियाला हाऊस कोर्ट कडून दिशा रवी ला एक दिवसीय पोलिस रिमांड देण्यात आली आहे. 26 जानेवारीच्या शेतकर्यांच्या रॅलीमध्ये हिंसाचारामध्ये या टूलकिटचा हात असल्याचे आरोप आहेत.
महाराष्ट्रातून कर्नाटकात Afzalpura आणि Aland सीमेवरून प्रवेश करणार्यांना RT-PCR negative testबंधनकारक करण्यात आली आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संंख्येवरून आता नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.
Dadra and Nagar Haveli चे खासदार Mohanbhai Delkar मुंबईच्या हॉटेलमध्ये आढळले मृतावस्थेत आढळले आहेत. दरम्यान या प्रकरणी आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
टूल किट केस प्रकरणामध्ये दिशा रवीला आज Dr Pankaj Sharma' court मध्ये सादर करण्यात आले. दरम्यान दिल्ली पोलिसांना या प्रकरणामध्ये तिचा 5 दिवसांचा रिमांड हवा आहे.
भारतामध्ये मागील काही दिवस कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याचं वाटत असतानाच आता मुंबई सह महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. मात्र कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना पुन्हा कोविड 19 गाईडलाईनचं पालन करण्याचं आवाहन केले आहे. यामध्ये नागरिकांनी मास्क, हॅन्ड सॅनिटायझरचा वापर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचं आवाहन केले आहे.
पुण्यामध्ये सध्या मिनी लॉकडाऊन आहे अकोला, अमरावती मध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
मुंबई मध्ये एकीकडे कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत असताना आता इंधन दरवाढीचा मुद्दा देखील कळीचा झाला आहे. यावरूनच आज मुंबईतील वांद्रे परिसरात 'अच्छे दिन' वरून भाजपा ला टोमणा मारत युवासेनेने पोस्टरबाजी केली आहे. यामध्ये 2015 चे दर आणि आजचे दर जाहीर करण्यात आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)