Coronavirus in Maharashtra: आज राज्यात 6,112 कोरोना बाधित रुग्णांची मोठी भर पडली असून 44 मृतांची नोंद झाली आहे. तर 2,159 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात आरोग्य सेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्संना 1 कोटीहून अधिक कोविड-19 लसीचे डोस देण्यात आले. ही किमया अवघ्या 34 दिवसांत साधली असून हे जगातील कोविड लसीकरणाचे सर्वात वेगवान प्रमाण आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.
Coronavirus in Mumbai: आज मुंबईत कोरोनाचे 823 नवे रुग्ण आढळून आले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 440 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
कोविड-19 च्या वाढत्या पादुर्भावामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 'जनता दरबार' उपक्रम पुढील दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटद्वारे दिली.
Sputnik V ला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी म्हणून Dr. Reddy’s Laboratories Ltd कडून DCGI कडे अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली असल्याची माहिती आज डॉ. रेडीज यांनी दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये आज शिवजयंतीचा उत्साह आहे. यंदा कोरोना वायरसमुळे राज्यात शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. दरम्यान राज्यात पुन्हा झपाट्याने कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता पसरली आहे. मात्र प्रत्येकाने काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान आज शिव जयंतीच्या निमित्ताने किल्ले रायगड, शिवनेरी वर खास शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यक्रम पडणार असून नागरिकांना सावधानता बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबई सह महाराष्ट्राच्या काही भागांत पुन्हा कोरोना झपाट्याने पसरत असल्याने नियमावली कडक करण्यात आली आहे. असिम्टमॅटिक रूग्ण अधिक असल्याने नागरिकांना वारंवार हात स्वच्छ धुणं, वैयक्तिक स्वच्छता राखणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि मास्कचा वापर करणं हे नियम कटाक्षाने पाळण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान सध्या महाविकास आघाडीमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व औषध प्रसाशन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासह एनसीपी नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे वाढती कोरोना रूग्ण संख्या पाहून पुन्हा सारी यंत्रणा अलर्ट मोड वर गेली आहे.