Social Media Fake Followers Racket Case: सोशल मीडिया बनावट फॉलोअर्स रॅकेट प्रकरणी रेपर बादशाहला समन्स ; 18 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबई, पुणे, ठाणे सह देशापरदेशातील बातम्या एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी मराठी लेटेस्टलीला नक्की भेट द्या.

19 Aug, 05:22 (IST)

सोशल मीडिया बनावट फॉलोअर्स रॅकेट प्रकरणी फौजदारी बुद्धिमत्ता युनिट, मुंबईने रेपर बादशाहला समन्स बजावून 20 ऑगस्ट रोजी हजर होण्यास सांगितले. एएनआयचे ट्वीट- 

 

19 Aug, 04:39 (IST)

झारखंडचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. एएनआयचे ट्वीट-

 

 

19 Aug, 04:06 (IST)

पुणे शहरात आज नव्याने 1224 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 76,157 झाली आहे. तर 1,168 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 14,468 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 3,70,391 झाली असून, आज 5,947 टेस्ट घेण्यात आल्या.

19 Aug, 03:58 (IST)

पंचगंगा नदीच्या पाण्याची वाढती पातळी पाहता पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील 1,700 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असल्याची माहिती मिळत आहे.

19 Aug, 03:43 (IST)

राजस्थानमध्ये आज 1 हजार 347 कोरोनाबाधितांची नोंद झाली आह. तर, 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 63 हजार 977 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्विट- 

 

19 Aug, 03:04 (IST)

कोरोना माहामारीमुळे संपूर्ण देशावर आर्थिक संकट ओढावले आहे. याचबरोबर चंदीगड येथील गणेशमूर्तीकारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

19 Aug, 02:25 (IST)

पश्चिम बंगाल येथे कोरोनाचे आणखी 3175 रुग्ण आढळले असून 55 जणांचा आज मृत्यू झाला आहे.

19 Aug, 02:20 (IST)

हरियाणा 896 रुग्ण आढळून आले असून 7 जणांचा बळी गेला आहे.

19 Aug, 02:09 (IST)

मुंबईत आज कोरोनाचे आणखी 931 रुग्ण आढळून आले असून 49 जणांचा बळी गेला आहे.

19 Aug, 01:55 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 11,119 रुग्ण आढळले असून 422 जणांचा बळी गेला आहे.

19 Aug, 01:51 (IST)

गुजरात येथे कोरोनाचे आणखी 1126 रुग्ण आढळून आल्याने आकडा 80,942 वर पोहचला आहे.

19 Aug, 01:40 (IST)

केरळ मधील इडुक्की येथे झालेल्या भुस्खलनामुळे 61 जणांचा बळी तर आणखी 9 जण बेपत्ताच आहेत.

19 Aug, 01:28 (IST)

गोव्यात आज कोरोनाचे आणखी 339 रुग्ण आढळून आले असून 298 जणांची प्रकृती सुधारली आहे.

19 Aug, 01:25 (IST)

आँध्र प्रदेश: गोदावरी नदीच्या पातळीत वाढ होऊन पुर परिस्थिती निर्माण झाल्याने गाव पाण्याखाली गेले आहे.

पहा व्हिडिओ:

19 Aug, 24:51 (IST)

चंदीगढ येथे कोरोनाचे आणखी 89 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2,305 वर पोहचला आहे.

19 Aug, 24:21 (IST)

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घाटकोपर येथील मुर्तिकाराने Sanitizer Ganesha साकारला आहे.

19 Aug, 24:07 (IST)

तमिळनाडू येथे कोरोनाचे आणखी 5709 रुग्ण आढळून आले असून 121 जणांचा बळी गेला आहे.

18 Aug, 23:52 (IST)

केरळात आज कोरोनाचे आणखी 1758 रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत 31,394 जणांनी कोविड19 च्या विरोधात यशस्वी लढा दिला आहे.

18 Aug, 23:33 (IST)

जम्मू-कश्मीर मध्ये आणखी 434 कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आकडा 29,326 वर पोहचला आहे.

Read more


ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रवादी आमदार सुधाकर  परिचारक यांचे पुण्यामध्ये निधन झाले आहे. दरम्यान कोरोनाची लागण झाल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना पंढरपूरमधून पुण्यात हलवण्यात आले होते. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र त्यांची काल रात्री प्राणज्योत मालवली आहे. त्यांचे वय 85 वर्ष होते.

दरम्यान काल अमेरिकेमध्ये ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडीत जसराज यांचेदेखील वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले. लवकरच त्यांचे पार्थिव शरीर भारतामध्ये आणले जाणार आहे. काही वेळापूर्वी अमेरिकेतील काऊंसलर जनरलनी त्यांच्या पार्थिवाचे न्यूजर्सी शहरामध्ये अंतिम दर्शन घेतले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

भारतामध्ये काल सर्वाधिक 8.97 कोविड 19 साठी चाचण्या करण्यात आल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात चाचण्या करून देखील संसर्गाचा दर कमी आला आहे. कालचा दर 8.81% इतका होता तर आठवड्याभरापूर्वी हाच दर 8.84% पर्यंत पोहचला होता. असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement