बिहारमध्ये आज 1,385 नवे कोरोना रुग्ण ; 16 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबई, पुणे सह देशा-परदेशातील घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी मराठी लेटेस्टलीला नक्की भेट द्या.

17 Jul, 05:17 (IST)

बिहारमध्ये आज 1,385 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.


 

17 Jul, 05:06 (IST)

मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत देणार असल्याचं  पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. 

 

 

 

17 Jul, 04:45 (IST)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुणपडताळणी, उत्तरपत्रिका छायांकित प्रती, पुनर्मुल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी प्रथमच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

17 Jul, 04:12 (IST)

दिल्ली सरकारने गुटखा, पान मसाल्याच्या निर्मिती, साठवण, वितरण आणि विक्रीवरील बंदी आणखी एका वर्षासाठी वाढविली आहे.

17 Jul, 03:51 (IST)

मुंबईतील फोर्ट येथे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आतापर्यंत 4 जणांचा मृतदेह आढळला आहे.

 

17 Jul, 03:41 (IST)

मुंबईच्या भानुशाली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 60 वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.

 

17 Jul, 03:29 (IST)

आज झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या फोर्ट भागातील भानुशाली इमारतीचा एक भाग कोसळला होता. त्या ठिकाणाहून आतापर्यंत एनडीआरएफच्या पथकाने 13 जणांना बाहेर काढले आहे. या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप बचावकार्य सुरू आहे.

17 Jul, 03:08 (IST)

मुंबई येथे एनडीआरएफच्या पथकाने, आज मुसळधार पावसानंतर फोर्ट येथील एका इमारतीचा काही भाग कोसळलेल्या ठिकाणाहून एका व्यक्तीला जिवंत ढिगाऱ्याखालून बाहेर काढले.

17 Jul, 03:08 (IST)

मुंबई येथे एनडीआरएफच्या पथकाने, आज मुसळधार पावसानंतर फोर्ट येथील एका इमारतीचा काही भाग कोसळलेल्या ठिकाणाहून एका व्यक्तीला जिवंत ढिगाऱ्याखालून बाहेर काढले.

17 Jul, 02:51 (IST)

गोव्यात आज 157 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.  त्यामुळे गोव्यातील कोरोना रुग्णांची संख्या 3,108 इतकी झाली आहे.

 

17 Jul, 02:29 (IST)

घाटकोपर येथे 90 फीट रोड जवळील मनीषा बार येथे  दरड कोसळली आहे.

17 Jul, 02:22 (IST)

गुजरात येथे आणखी 919 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून आकडा  45,567 वर पोहचला आहे.

17 Jul, 02:18 (IST)

ओडिशा सरकारकडून गनजम, क्रोधा, कट्टक, जयपूर आणि रौकेला महापालिका परिसरात 14 दिवसांचा कठोर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

17 Jul, 01:59 (IST)

पश्चिम बंगाल येथे कोरोनाच्या आणखी 1690 रुग्णांची भर पडली असून 23 जणांचा बळी गेला आहे.

17 Jul, 01:44 (IST)

मध्य प्रदेशात आणखी 735 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 20378 वर पोहचला आहे.

17 Jul, 01:31 (IST)

मुंबईतील फोर्ट येथे इमारतीचा भाग कोसळल्याच्या घटनास्थळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली आहे.

17 Jul, 01:18 (IST)

मुंबईत आणखी 1498 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 56 जणांचा आज मृत्यू  झाला आहे.

17 Jul, 01:16 (IST)

मालाड येथे चाळीचा भाग कोसळ्यानंतर 15 जणांची सुटका तर 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

17 Jul, 01:10 (IST)

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात आणखी 8641 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 266 जणांचा बळी गेला आहे.

17 Jul, 24:57 (IST)

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांची COVID19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Read more


महाराष्ट्रामध्ये आज 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास दिवस आहे. आज राज्याचा एचएससी बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान लाखो विद्यार्थ्यांना यंदा ऑनालाईन त्यांचा निकाल दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. कोरोना संकटकाळात यंदा निकाल लावण्याच्या प्रक्रियेला थोडा उशिर झाला आहे.

अमेरिकेमध्ये आज जो बिडेन, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलोन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि अ‍ॅपल अशी हाय प्रोफाईल आणि व्हेरिफाईड व्यक्तींची ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

आज सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला असल्याचेही वृत्त देण्यात आले आहे. हा 4.5 रिश्टल स्केलचा भूकंप होता.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान देशामध्ये कोरोनाचा कहर अद्यापही सुरूच आहे. देशामध्ये साडे नऊ लाखांच्या उंबरठ्यावर कोरोनाग्रस्तांची संख्या पोहचली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

12 वीचा निकाल breaking news Coranavirus in India Coranavirus in Maharashtra Coranavirus in Mumbai Coronavirus Death Toll in India Coronavirus Death Toll in Maharashtra Coronavirus in India Coronavirus In Maharashtra Coronavirus Lockdown Coronavirus Pandemic Coronavirus positive cases in India Coronavirus Positive Cases in Maharshtra Coronavirus updates COVID-19 Hsc Result 2020 HSC Results 2020 Latest Marathi News Live Breaking News Headlines Maharashtra Board Results 2020 maharashtra news Marathi News Monsoon 2020 Monsoon 2020 Updates Mumbai आजच्या ठळक बातम्या कोरोना विषाणूबद्दल माहिती कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस अपडेट्स कोरोना व्हायरस भारत कोरोना व्हायरस महाराष्ट्र कोरोना व्हायरस मुंबई कोरोना व्हायरस मृत्यू कोरोना व्हायरस रुग्णसंख्या कोरोना व्हायरस लॉकडाऊन कोविड-19 ताज्या घडामोडी ताज्या बातम्या बोर्ड परीक्षा निकाल बोर्ड परीक्षा निकाल 2020 ब्रेकिंग न्युज ब्रेकिंग न्यूज मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्युज महाराष्ट्र मान्सून महाराष्ट्र लाईव्ह ब्रेकिंग न्यूज मान्सून 2020 अपडेट्स मुंबई कोरोना व्हायरस राजकीय घडामोडी
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement