तामिळनाडू येथे आज आणखी 451 कोरोनाबाधितांची नोंद; 16 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

17 Feb, 05:07 (IST)

तामिळनाडू येथे आज आणखी 451 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 8 लाख 46 हजार 26 वर पोहचली आहे. ट्वीट-

 

17 Feb, 04:32 (IST)

महाराष्ट्र: पिंपरी चिंचवड पोलिस व पुणे शहर पोलिसांनी गजानन मार्णेविरूद्ध मोठ्या संख्येने वाहने घेऊन मिरवणूक काढल्याबद्दल, बेकायदेशीरपणे ड्रोनने गोळीबार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. 2014 च्या खून प्रकरणात त्याची सुटका झाल्यानंतर तो तुरूंगातून बाहेर पडला होता.

 

17 Feb, 03:26 (IST)

मध्य प्रदेश: घाटवाहा गावात, निवारी येथील वाळू उत्खनन ठिकाणी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वाळूचा ढीग त्यांच्यावर कोसळल्यानंतर ते जखमी झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद करून  केली आहे आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. एसपी निवारी एस. आलोक कुमार यांनी ही माहिती दिली.

17 Feb, 02:55 (IST)

डॉ. किरण बेदी पुडुचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून पायउतार. त्यांच्या ऐवजी पुडुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून तेलंगानाचे राज्यपाल असलेल्या तमिलीसाई सौंदराराजन यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

17 Feb, 02:10 (IST)

पटना येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या शाळेच्या मुख्यधापकाला पोस्को कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ट्वीट-

 

17 Feb, 01:35 (IST)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून दहावी आणि बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 29 एप्रिल ते 20 मे 2021 दरम्यान दहावी बोर्डाची परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर 23 एप्रिल ते 21 मे 2021 दरम्यान बारावीची परीक्षा होणार असल्याचं या संभाव्य वेळापत्रकात बोर्डाने जाहीर केलं आहे.

17 Feb, 01:33 (IST)

महाराष्ट्रात आज आणखी 3 हजार 663 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19 लाख 81 हजार 408 वर पोहचली आहे. ट्वीट-

 

17 Feb, 01:08 (IST)

राज्यसभेच्या अध्यक्षांनी आजपासून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना मान्यता दिली आहे. ट्वीट-

 

17 Feb, 24:10 (IST)

 

खासदार नवनीत राणा यांना अॅसिड टाकून जिवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती एबीपी माझाने आपल्या वृत्तात दिली आहे. शिवसेनेच्या लेटरहेडवरुन धमकी आल्याचा दावा करत त्यांनी दिल्लीतील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे सांगितले जात आहे. 

16 Feb, 23:23 (IST)

भारताने गेल्या सहा वर्षात जगातील सर्वात मोठ्या जनकल्याणकारी कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

 

16 Feb, 22:55 (IST)

जागतिक लसीकरणात भारत मध्यवर्ती भूमिका निभावत आहे. निरोगीपणाबद्दल आमची दृष्टी घरगुती तितकीच जागतिक आहे. आरोग्य आणि निरोगीपणाकडे जग गांभीर्याने पहात आहे, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. ट्वीट-

 

 

16 Feb, 22:15 (IST)

भारतातून आतापर्यंत 24 देशांना COVID19 ची लस दिल्याचे नीती आयोगाने म्हटले आहे.

16 Feb, 22:06 (IST)

मध्य प्रदेशातील सीधी येथे कालव्यात बस कोसळल्याप्रकरणी 42 जणांचे मृतदेह हाती लागल्याची विभागीय आयुक्त राजेश कुमार जैन यांनी  माहिती दिली आहे.

16 Feb, 21:48 (IST)

Toolkit प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दिशा हिला आपल्या आईसह अन्य नातेवाईकांशी बोलता येणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

16 Feb, 21:23 (IST)

सेनसेक्स 49.96 अंकांनी घसरुन 52,104.17 वर पोहचला तर निफ्टीत सुद्धा 1.25 अंकांची घसरण झाली आहे.

16 Feb, 21:06 (IST)

कोची येथे डॉलर तस्करी प्रकरणी कस्टम डिपार्टमेंटकडून एमडी संतोष अय्यपन याला अटक करण्यात आली आहे.

16 Feb, 20:49 (IST)

काँग्रेस कडून  वाढलेल्या पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याने उपोषण करण्यात येत आहे.

16 Feb, 20:21 (IST)

Toolkit प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दिशा रवी हिच्या समर्थनार्थ दिल्ली कमिशन फॉर वुमन यांनी पोलिसांना नोटीस धाडली आहे.

16 Feb, 19:53 (IST)

नागरिकांनी जर नियमांचे पालन न केल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा लागेल असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

16 Feb, 19:46 (IST)

मध्य प्रदेशात कालव्यात बस पडून झालेल्या अपघाताप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मृतांच्या परिवाराला 2 लाखांची मदत जाहीर केली आहे.

Read more


काल देशभरात माघी गणेशोत्सव जयंती पार पडल्यानंतर आज सर्वत्र वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे. तर वाराणसीतील पवित्र अशा गंगा नदीत वसंत पंचमी निमित्त स्नान करण्यासाठी भाविक एकत्रित आले आहे. त्याचसोबत राष्ट्रापती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी जनतेला वसंत पंचमी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला पेट्रोल डिझेलचे दर आज पुन्हा एकदा वाढले आहेत. दिल्लीत पेट्रोल 89.29 रुपये प्रति लीटर (30 पैशांनी वाढ) तर डिझेल 79.90 रुपये प्रति लीटर (35 पैशांनी वाढ) झाले आहे.

तसेच महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याची घटना मुंबई-पुणे महामार्गावर घडली आहे. काल जळगाव मध्ये झालेल्या अपघातानंतर आजच्या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तर काही गाड्यांमध्ये टक्कर होत हा अपघात झाला असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना आणि डान्सबार बंदी यशस्वीपणे अंमलात आणून महाराष्ट्राच्या राजकारणात अढळ स्थान निर्माण करणारे माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व ग्रामविकास मंत्री स्व.आर आर.पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement