Nitin Gadkari यांच्या अटीवर खासदार Anil Firojiya यांनी कमी केलं 15 किलो वजन; गडकरींकडे केली 15 हजार कोटींची मागणी, काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या
तेव्हा गडकरींनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली. त्यांनी आपले वजन कमी केले तर प्रत्येक किलोग्रामच्या बदल्यात या भागाच्या विकासासाठी 1 हजार कोटींचे बजेट दिले जाईल.
मध्य प्रदेशातील उज्जैन लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनिल फिरोजिया (Anil Firojiya) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे आव्हान स्वीकारले आणि आपले वजन कमी केले. आता फिरोजियाने दावा केला आहे की, त्यांनी 15 किलो वजन कमी केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन परिसराच्या विकासासाठी 15 हजार कोटी रुपयांची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
अनिल फिरोजिया सातत्याने नितीन गडकरी यांच्याकडे परिसराच्या विकासासाठी बजेटची मागणी करत होते. तेव्हा गडकरींनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली. त्यांनी आपले वजन कमी केले तर प्रत्येक किलोग्रामच्या बदल्यात या भागाच्या विकासासाठी 1 हजार कोटींचे बजेट दिले जाईल. नितीन गडकरींचे आव्हान मिळाल्यानंतर खासदारांनी वजन कमी करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली. फेब्रुवारीमध्ये फिरोजियाचे वजन 125 किलो होते. फिरोजिया जितके किलो वजन कमी करतील, तितका त्यांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघासाठी हजार कोटींचा निधी मिळेल, अशी घोषणा नितीन गडकरींनी मंचावरून केली होती, असे खासदार म्हणाले. (हेही वाचा - Kerala Gold Smuggling Case: सोने तस्करी प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेशला मीडियासमोर अनावर झाले अश्रू, काय आहे प्रकरण? जाणून घ्या, Watch Video)
गडकरींनी त्यांना तंदुरुस्त होण्यासाठी प्रेरित केल्याचे फिरोजिया यांनी सांगितले. मी सध्या फिटनेसचे नियम पाळत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मला मंचावर सांगितले की, उज्जैनमधील विकासकामांसाठी मी एक किलोग्रॅम कमी करण्यासाठी एक हजार कोटी रुपये देणार आहे. मी ते आव्हान म्हणून घेतले, आतापर्यंत मी 15 किलो वजन कमी केले आहे. त्यांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्याची विनंती मी त्यांना केली आहे, असं फिरोजिया यांनी म्हटलं आहे.