भारतीय संघाच्या भगव्या जर्सीवर अबू आझमी यांचा आक्षेप; सरकार देशाचे 'भगवाकरण' करत असल्याचा आमदार एमए खान यांचा आरोप (Video)
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (SP MLA Abu Azmi) यांनी भगव्या जर्सीवर आक्षेप घेतल्यानंतर, आमदार एमए खान (MA Khan) यांनी देखील सरकारवर हल्ला चढवत ‘भगवाकरणा’चा आरोप केला आहे.
सध्या चालू असलेली विश्वचषक स्पर्धा (ICC Cricket World Cup 2019) अतिशय रंगतदार वळणार येऊन पोहचली आहे. यंदा या स्पर्धेमध्ये 10 संघ उतरले आहेत. यातील काही संघ दोन जर्सी वापरून खेळताना दिसले होते, त्यामुळे भारतानेही दोन जर्सी वापरण्याचा निर्णय घेतला. यासाठी भारताला भगव्या रंगाची जर्सी (Orange Jersey) देण्यात आली. मात्र या जर्सीच्या रंगावरून देशात सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (SP MLA Abu Azmi) यांनी भगव्या जर्सीवर आक्षेप घेतल्यानंतर, आमदार एमए खान (MA Khan) यांनी देखील सरकारवर हल्ला चढवत ‘भगवाकरणा’चा आरोप केला आहे.
याबाबत बोलताना कॉंग्रेस आमदार, एमए खान म्हणाले, ‘हे सरकार प्रत्येक गोष्टीला दोन प्रकारे पाहण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न गेली पाच वर्षे करत आहे. यामध्ये खेळापासून ते सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत अनेक गोष्टी सामील आहेत. आता हे सरकार संपूर्ण देशाला ‘भगवाकरणा’कडे घेऊन जात आहे, जे अयोग्य आहे.’ (हेही वाचा: सचिन, विराट च्या सुपर फॅन ने शेअर केला टीम इंडिया च्या ऑरेंज जर्सी चा फोटो, (See Pic))
दरम्यान, भारतीय संघ 30 जून रोजी इंग्लंड (England) विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ निळ्या जर्सी ऐवजी नारंगी जर्सी घालून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाच्या जर्सीचे रंग सारखेच असल्याने भारतीय संघाकडे भगव्या जर्सीचा पर्याय आहे. मात्र आता त्याला अबू आझमी, एमए खान यांच्यासह अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे.