महाशिवरात्रीचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान

पूजा केली. यावेळेस मुख्यमंत्री आणि त्यांचे निकटवर्तीय उपस्थित होते.

Devendra Fadnavis At Kunbh Mela 2019 ( Photo Credits: Twitter)

यंदा प्रयागराज (Prayagraj)येथे भरलेल्या महाकुंभमेळ्याचा (Maha Kunbh Mela 2019) शेवटचा दिवस आहे. महाशिवरात्रीच्या (Maha Shivratri) मुहूर्तावर आज अनेक भाविकांनी महाकुंभमेळ्याला भेट देऊन शाही स्नान केले. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील महाकुंभमेळ्याला भेट देऊन त्रिवेणी संगमावर स्नान केले. गंगेमध्ये डुबकी मारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळच्या धार्मिक स्थळांना भेट दिली. पूजा केली. यावेळेस मुख्यमंत्री आणि त्यांचे निकटवर्तीय उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कुंभमेळ्याला भेट दिली होती. त्यावेळेस त्यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनाचे, स्वच्छतेचे कौतुक केले होते. Kumbh Mela 2019: सर्वात मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्वच्छता अभियान यासाठी कुंभमेळ्याची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

महाकुंभमेळ्याचे कौतुक

महाकुंभ मेळ्यामध्ये जगभरातून करोडो भाविक येतात. मात्र प्रयागराज येथे आयोजित यंदाच्या कुंभमेळ्यात जितकी भव्यता आणि दिव्यता आहे तितकीच स्वच्छता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. साऱ्या भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.Kumbh Mela 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांची त्रिवेणी संगमावर डुबकी, सफाई कर्मचाऱ्यांचे धुतले पाय (Watch Video)

नरेंद्र मोदींप्रमाणेच प्रयागराज येथील कुंभमेळ्याला अमित शहा, स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन त्रिवेणी संगमावर स्नान केले आहे.