Andhra Pradesh: चमत्कार! दोन वर्षांपूर्वी 2 मुली गमवल्या, त्याच दिवशी माता-पित्यांनी दिला जुळ्या मुलींना जन्म

आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे दोन वर्षापूर्वी एक बोट दुर्घटना घडली होती. ज्यात एका दाम्पत्याने आपल्या दोन जुळ्या मुलींना (Twin Girl) गमावल्या होत्या.

Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) येथून सर्वांना आश्चर्यचकीत करणारी घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे दोन वर्षापूर्वी एक बोट दुर्घटना घडली होती. ज्यात एका दाम्पत्याने आपल्या दोन जुळ्या मुलींना (Twin Girl) गमावल्या होत्या. त्यानंतर याच दिवशी या दाम्पत्याने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. हा एक चमत्कार मानला जात असून संबंधित दाम्पत्याने ही सर्व देवाची कृपा असल्याचे म्हटले आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून दुखात असलेल्या या दाम्पत्याना दोन जुळ्या मुलींचा जन्म झाल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजू आणि भाग्यलक्ष्मी असे या दाम्पत्याचे नावे आहेत. हे दाम्पत्य आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथील रहिवाशी आहेत. या दाम्पत्यानी दोन वर्षांपूर्वी 15 सप्टेंबर 2019 रोजी गोदावरी नदीत घडलेल्या बोट अपघातात आपल्या दोन जुळ्या मुली गमावल्या होत्या. मात्र, याच दिवशी त्यांनी पुन्हा दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. यावर भाग्यलक्ष्मीने आपली प्रतिक्रिया दिली असून आम्ही खूप आनंदी आणि धन्य आहोत. ही सर्व देवाची कृपा आहे, असे तिने म्हटले आहे. हे देखील वाचा- Andhra Pradesh Shocker: आंध्र प्रेदश येथील धक्कदायक घटना! एका तरूणाकडून आत्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी राजूची आई तेलंगणातील भद्राचलम येथील रामाच्या मंदिरात तिच्या दोन नातवंडांसह बोटीने जात होती. त्यावेळी त्यांच्या बोटीला अपघात झाला. ज्यात त्यांनी आपल्या दोन्ही मुली गमवल्या होत्या. दरम्यान, भाग्यलक्ष्मी आणि त्यांचे पती गेल्या वर्षी मुलासाठी शहरातील एका फर्टिलिटी सेंटर येथे गेल्या होत्या. परंतुकोरोना मुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले होते. मात्र, यावर्षी त्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आणि 15 सप्टेंबर रोजी आयव्हीएफ प्रक्रियेद्वारे जुळ्या मुलींना जन्म दिला.