Aadhaar PVC Card ओपन मार्केट मधून घेतल्यास ते वैध नसेल; UIDAI ने ट्वीट करत केले नागरिकांना सावधान

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

UIDAI ने नागरिकांना आधार कार्ड सुरक्षित आणि सुलभ पणे सोबत ठेवता यावं म्हणून PVC Aadhaar उपलब्ध करून दिले आहे. UIDAI च्या वेबसाईटवर त्यासाठी अर्ज करून 50 रूपये शुल्क भरून ते घरपोच मिळवता येते पण सध्या काही जण ते ओपन मार्केट मधून मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नुकतच UIDAI ने ट्वीट करत अशाप्रकारे ओपन मार्केट मधून बनवलेले PVC Aadhaar ग्राह्य मानलं जाणार नाही असे सांगितले आहे.

UIDAIच्या माहितिनुसार, ओपन मार्केट मधील PVC Aadhaar वर सिक्युरिटी फीचर्स नसतात. त्यामुळे नागरिकांनी अधिकृतपणेच आधार पीव्हिसी कार्ड मागवावं. नक्की वाचा: Aadhaar Letter, eAadhaar, mAadhaar आणि Aadhaar PVC Card मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या.

Aadhaar ट्वीट  

आधार पीव्हीसी कार्ड काय आहे?

पीव्हीसी बेस्ड आधार कार्ड हे डिजिटली साईंड सिक्युअर क्युआर कोड सह सारी माहिती दिलेले कार्ड असतं. UIDAI कडून ते फास्ट पोस्टने नागरिकांच्या रहिवासी पत्त्यावर पाठवलं जातं. नक्की वाचा: Aadhaar PVC Cards: 'आधार पीव्हीसी कार्ड' म्हणजे काय? घर बसल्या 'या' पद्धतीने करू शकता ऑनलाईन ऑर्डर; जाणून घ्या .

UIDAI च्या वेबसाईटनुसार, कार्डवर कोणती सिक्युरिटी फीचर्स असतात?

सिक्युअर क्युआर कोड, होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट, घोस्ट इमेज, इश्यू डेट आणि प्रिंट डेट, Guilloche Pattern आणि Embossed Aadhaar Logo आहे.

भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) ऑक्टोबर 2019 मध्ये पीव्हीसी कार्डांवर छापलेले एक पूर्णपणे नवीन आधार कार्ड लॉन्च केले आहे.   नवीन आधार पीव्हीसी कार्ड एटीएम किंवा डेबिट कार्डसारख्या आकाराचे आहे, जे तुम्ही सहजपणे आपल्या पर्समध्ये ठेवू शकता. आपण घर बसल्या आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी एकाचं मोबाइल नंबरवरून आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाइन मागवू शकता.