Digital Currency: RBI 1 डिसेंबरला लाँच करणार डिजिटल रुपया; 'या' चार शहरांमध्ये सुरू होणार पायलट प्रोजेक्ट

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँका डिजिटल रुपये जारी करण्याचे काम करतील. सध्या चार बँका स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक देशातील चार शहरांमध्ये रिटेल डिजिटल रुपया जारी करण्यासाठी काम करतील.

Digital Currency (PC- Pixabay)

Digital Currency: घाऊक डिजिटल रुपयानंतर आता आरबीआय (RBI) 1 डिसेंबरपासून रिटेल डिजिटल रुपया (Digital Rupee)लाँच करणार आहे. रिटेल डिजीटल रुपयामुळे ग्राहक कोणत्याही दुकानातून परस्पर व्यवहारांसह खरेदी करू शकतील. सध्या देशातील चार शहरांमधून प्रायोगिक स्वरूपात रिटेल डिजिटल रुपयाचा पायलट प्रोजेक्ट सुरू आहे. या शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि भुवनेश्वर यांचा समावेश आहे. यानंतर अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, कोची, लखनौ, पाटणा आणि शिमला या शहरांमध्ये डिजिटल रुपयाची सुरूवात होईल.

डिजिटल रुपयाच्या घाऊक आणि किरकोळ चलनाच्या पायलट प्रोजेक्टनंतर, डिजिटल रुपयाचे परिचलन पूर्णपणे सुरू केले जाईल. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँका डिजिटल रुपये जारी करण्याचे काम करतील. सध्या चार बँका स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक देशातील चार शहरांमध्ये रिटेल डिजिटल रुपया जारी करण्यासाठी काम करतील. नंतर बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक देखील या पायलट प्रोजेक्टमध्ये सामील होतील. (हेही वाचा - Crypto Investment: तुम्ही क्रिप्टोमध्येही गुंतवणूक केली आहे का?, मात्र बिटकॉइन-इथेरियम, NFT कधीही कायदेशीर निविदा होणार नसल्याची मोदी सरकारची माहिती)

कसा असेल डिजिटल रुपया?

कागदी नोटांप्रमाणेच बँका डिजिटल रूपे जारी करतील. हे ठेवण्यासाठी, बँका ग्राहकांना डिजिटल वॉलेट प्रदान करतील, जे मोबाईल फोन किंवा इतर उपकरणांमध्ये साठवले जाऊ शकतात. मात्र, डिजिटल रुपया ठेवल्यावर बँकेकडून कोणतेही व्याज दिले जाणार नाही. ग्राहक एकमेकांशी व्यवहार करू शकतील आणि डिजिटल पैशाने दुकानातून खरेदी करू शकतील. खरेदी करण्यासाठी ते व्यापाऱ्याचा QR कोड वापरतील.

डिजिटल रुपया अधिक सुरक्षित असणार -

रिझर्व्ह बँकेच्या वतीने बँकांद्वारे डिजिटल रुपया दिला जाईल, त्यामुळे तो कायदेशीर असेल. तो कागदी नोटांपेक्षा अधिक सुरक्षित असेल. यामुळे नागरिक कुठेही पैसे देऊ शकतील आणि त्यांना पाहिजे तेव्हा नोटांच्या स्वरूपात बँकेत जमा करू शकतील. जेणेकरून व्याज मिळू शकेल. 1 डिसेंबरपासून प्रायोगिक स्वरूपात, डिजिटल रुपयाची निर्मिती, त्याचे वितरण आणि त्याचा किरकोळ वापर यासंबंधीच्या सर्व प्रक्रियेचे रिअल टाइममध्ये निरीक्षण केले जाईल. (हेही वाचा - Indian Digital Rupee: आरबीआय लवकरच लॉन्च करणार डिजिटल रुपया, केंद्रीय अर्थकंल्पात निर्मला सीतारमण यांची घोषणा)

तज्ज्ञांच्या मते, कायदेशीर डिजिटल मनी जारी केल्याने क्रिप्टोकरन्सीला काही फरक पडणार नाही. कारण क्रिप्टोकरन्सीचे मूल्य नेहमीच चढ-उतार होत असते तर डिजिटल रुपयात असे काहीही होणार नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now