Pradhan Mantri Awas Yojana: 31 मार्च पर्यंत घर खेरदीवर केंद्र सरकार देत आहे 2.67 लाख रुपयांची सूट; 'या' पद्धतीने करा अर्ज

याचा फायदा 2.50 लाखाहून अधिक मध्यमवर्गीय कुटुंबांना होऊ शकतो.

Home | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

Pradhan Mantri Awas Yojana: प्रत्येक व्यक्तीला आपले स्वतःचे एक घर असावं, असं वाटत असतं. आजच्या काळात वाढत्या महागाईमुळे सर्वांना घर विकत घेणे शक्य नाही. अशा परिस्थितीत ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशा लोकांसाठी घरे खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार एक विशेष योजना आणली आली आहे. पीएम आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) असं या योजनेचे नाव आहे. त्याअंतर्गत देशातील कोट्यवधी लोकांना स्वस्त घरं खरेदी करण्याची संधी मिळत आहे. केंद्र सरकारच्या या योजनेत लोकांना 2.67 लाख लाखांपर्यंतचे अनुदान देण्यात येत आहे. नागरिकांना 31 मार्च 2021 पर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करणं आवश्यक आहे.

प्रथमचं घर विकत घेणाऱ्यांनाचं या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेअंतर्गत पहिल्यांदा गृह खरेदीदारांना क्रेडिट लिंक्ड सब्सिडी दिली जाते. याचा अर्थ असा की, आपण घर खरेदीसाठी गृह कर्ज घेतल्यास त्यावरील व्याजावर अनुदान दिले जाते. पीएम आवास योजनेंतर्गत सरकारने क्रेडिट लिंक्ड सब्सिडी 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याचा फायदा 2.50 लाखाहून अधिक मध्यमवर्गीय कुटुंबांना होऊ शकतो. केंद्र सरकारने 25 जून 2015 रोजी ही योजना सुरू केली होती. (वाचा - Pan Aadhaar Linking: 31 मार्चपूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करा, अन्यथा भरावा लागू शकतो 10,000 रुपयांचा दंड)

या योजनेंतर्गत, 3 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना ईडब्ल्यूएस विभागात 6.5% अनुदान दिले जाईल. वर्षाकाठी 3 लाख ते 6 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना एलआयजी अंतर्गत 6.5 टक्के अनुदान मिळेल. त्याचबरोबर एमआयजी 1 श्रेणी अंतर्गत 6 लाख ते 12 लाख वार्षिक उत्पन्न मिळविणाऱ्यांना 4 टक्के क्रेडिट लिंक्ड सब्सिडी देण्यात येणार आहे.

PMAY योजनेचा लाभ घेण्यासाठी 'असा' करा अर्ज -

या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम PMAY https://pmaymis.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. आपण एलआयजी, एमआयजी किंवा ईडब्ल्यूएस श्रेणी अंतर्गत असल्यास, इतर 3 घटकांवर क्लिक करा. यातील पहिल्या कॉलममध्ये आपला आधार नंबर प्रविष्ट करा. दुसर्‍या कॉलममध्ये आधार कार्डवरील आपले नाव प्रविष्ट करा. यानंतर, उघडलेल्या पृष्ठावर आपल्याला नाव, पत्ता, कुटुंबातील सदस्य आजी संदर्भात माहिती भरा. यानंतर, तळाशी असलेल्या एका बॉक्सवर क्लिक करा. ज्यावर असे लिहिलं असेल की, आपण या माहितीच्या शुद्धतेचे प्रमाणित आहात. सर्व माहिती सादर केल्यानंतर, आपल्याला कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल. यानंतर हा फॉर्म सबमिट करा

केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा फक्त अशा लोकांना होणार आहे, ज्यांच्याकडे आधीपासून पक्के घर नाही. त्याशिवाय ते इतर कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेचा लाभ घेत नाहीत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे.