Voter ID Representational Image (Photo Credits: IANS)

लोकसभा निवडणूकींसाठी (Lok Sabha Elections) आता मतदानाची (Voting) जवळ येऊन ठेपली आहे. देशात पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल दिवशी मतदान होणार आहे. देशात 102 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार असून यामध्ये महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. राज्यात 19 एप्रिलला विदर्भातील रामटेक, भंडारा-गोंदिया, नागपुर, गढचिरोली-चिमूर आणि चंद्रपुर मध्ये मतदान होणार आहे. या भागातील मतदार उद्या मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर या महत्त्वाच्या उमेदवारांचे राजकीय भविष्य मतपेटीत कैद होणार आहे. या निवडणूकीचा निकाल 4 जून दिवशी लागणार आहे.

लोकसभा मतदानाचा कसा, कधी, कुठे बजावाल हक्क ?

19 एप्रिलला मतदानाच्या पहिल्या टप्प्यात 97 उमेदवार निवडणूक लढणार असून 10,652 मतदान केंद्र सज्ज आहेत. 95,54,667 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.