आयुष्मान भारत योजने अंतर्गत तुम्हांला 5 लाखाचा आरोग्य वीमा मिळणार हे कसे तपासून पहाल?
23 सप्टेंबरपासून आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी सरकारी वीमा योजना सुरू होणार आहे.
आयुष्मान भारत योजना ही नरेंद्र मोदींची बहूप्रतिक्षित योजनांपैकी एक आहे. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरील भाषणात मोदींनी या योजनेचा उल्लेख केला होता. त्यानंतर ही योजना तातडीने अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. येत्या 23 सप्टेंबरला झारखंडमध्ये पंतप्रधान जन आरोग्य योजना (PMJAY)लॉन्च होणार आहे.
काय आहे ही योजना?
आयुष्मान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी सरकारी वीमा योजना आहे. या योजनेचा फायदा सुमारे 10 कोटी भारतीय कुटुंबांना होणार आहे. या योजनेमुळे 5 लाख रूपयांपर्यंतचा आरोग्य वीमा मिळणार आहे. मूलभूत आरोग्यसेवेच्या अभावी अनेक रूग्णांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे गरीब रूग्णांसाठी ही योजना आशेचा किरण ठरणार आहे. देशातील 50 कोटी गरीबांना याचा फायदा मिळणार आहे.
नरेंद्र मोदींनी या योजनेची घोषणा केल्यानंतर अनेक बनावट वेबसाईट्सचं पेव फूटलं आहे. यामुळे काही लोक गरीब नागरिकांची फसवणूक करत आहेत. ही फसवणूक टाळण्यासाठी सरकारने खास हेल्पलाईन सुरू केली आहे.
आयुष्मान भारत योजनेत तुमचं नाव आहे की नाही ? कसे पडताळाल ?
https:www.abnhpm.gov.in या वेबसाईटवर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक एन्टर करा
मोबाईल क्रमांकावर तुम्हांला OTP क्रमांक मिळेल.
त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन स्क्रीन ओपन होईल.
त्या स्क्रीनवर तुम्ही चार विविध पर्यायांनी तुमचं नाव पडताळून पाहू शकता.
14555 हेल्पलाइन नंबरवरही तुम्हांला मदत मिळू शकते.
काही सरकारी रूग्णालयांमध्ये या योजनेचा पायलट प्रोजेक्ट सुरू आहे. तेथे आयुषमान मित्र आहे. ही व्यक्ती सरकारी हॉस्पिटल आणि लाभार्थींमध्ये दुवा म्हणून काम करणार आहे.