7th Pay Commission: खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी मिळणार गिफ्ट; महागाई भत्त्यात झाली 11 टक्क्यांची वाढ
सीएम शिवराज यांनी थेट 11 टक्क्यांनी वाढ केली असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 31 टक्क्यांवर पोहोचला आहे.
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. सरकारने होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना भरघोस भेटवस्तू दिल्या आहेत. सरकारने महागाई भत्त्यात (Dearness Allowance) 11 टक्क्यांची बंपर वाढ केली आहे. जी एप्रिल 2022 पासून उपलब्ध होईल. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशच्या सरकारी कर्मचाऱ्यांना ही मोठी भेट दिली आहे. राज्यातील 7 लाखांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये महागाई भत्त्यात (डीए) वाढ झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, सीएम शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या वाढदिवशी ही घोषणा केली आणि सांगितले की, सरकारी कर्मचार्यांचा महागाई भत्ता जो आम्ही कोरोनाच्या काळात वाढवू शकलो नाही, तो आता वाढवला जाईल. डीए 31 टक्क्यांनी वाढेल, जो एप्रिल महिन्यापासून लागू केला जाईल. म्हणजेच एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. या घोषणेनंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच डीए मिळणार आहे. (वाचा -Women's Day 2022 Special: नवोदित महिला उद्योजकांसाठी 'या' 5 Government Schemes ठरतील उपयुक्त; Entrepreneurs होऊ ईच्छीणाऱ्या महिलांनी नक्की वाचा)
11 टक्क्यांची वाढ -
मध्य प्रदेशमध्ये ऑक्टोबरमध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 8 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 20 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर आता सीएम शिवराज यांनी थेट 11 टक्क्यांनी वाढ केली असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 31 टक्क्यांवर पोहोचला आहे.
वास्तविक, मध्य प्रदेशातील कर्मचारी जुनी पेन्शन बहाल करण्याची मागणी करत आहेत. अशा स्थितीत शिवराज सरकारची ही घोषणा या कर्मचाऱ्यांना जोपासण्याचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. राजस्थान सरकारप्रमाणेच मध्य प्रदेशातही जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, शिवराज सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्येही वाढ निश्चित -
दीर्घ प्रतीक्षेनंतर, महागाई भत्त्यात 3% वाढ निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% दराने महागाई भत्ता (डीए वाढ) मिळेल. औद्योगिक कामगारांसाठी (AICPI निर्देशांक) डिसेंबर 2021 च्या ग्राहक किंमत निर्देशांकात एका अंकाची घट झाली आहे. महागाई भत्त्यासाठी सरासरी 12 महिन्यांचा निर्देशांक सरासरी 34.04% (महागाई भत्ता) सह 351.33 आहे. परंतु, महागाई भत्ता नेहमी पूर्ण संख्येने दिला जातो. म्हणजेच जानेवारी 2022 पासून एकूण महागाई भत्ता 34% असेल.