What is Digital Arrest? डिजिटल अटक म्हणजे काय? ती कोणाला होऊ शकते? घ्या जाणून
डिजिटल अटक म्हणजे काय? ही अटक एक आभासी संयम युक्ती आहे. जी सायबर गुन्हेगारांकडून पीडितांना त्यांच्या घरात अडकवण्यासाठी आणि त्यांची फसवणूक करण्यासाठी वापरली जाते. अनेकदा तोतया लोक, सायबर गुन्हेगार कायदेशीर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांप्रमाणे वर्तन करतात.
केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) अधिकारी असल्याचे भासवून तोतयांच्या एका गटाने लखनौ-स्थित लेखक-कवी नरेश सक्सेना यांना लक्ष्य केले. या तोतयांनी त्यांना डिजिटल अटक (What is Digital Arrest) केली. ही घटना 7 जुलै रोजी घडली. घटनेची सुरुवात एका व्हिडिओ कॉलने झाली. रोहन शर्मा नावाच्या एका व्यक्तीने सक्सेना यांना आपण सीबीआय इन्स्पेक्टर असल्याचे सांगीतले. या व्यक्तीने त्यांना सांगितले की, आपण मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात तपास करत आहोत. त्यामुळे आपणास अटक होण्याची शक्यता आहे. तोतयांनी आपले नाट्य हुबेहुब वटवल्याने सक्सेना यांनाही कोणता संशयआला नाही. अखेर तोतयांनी यांना डिजिटल अटक करुन प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब आणि फैज अहमद फैज यांच्या दोहेचे पठण करण्यास सांगितले. तसेच, तुरुंगवासाची कारवाई ते टाळू शकतात. मात्र, त्यासाठी त्यांना विविध मागण्या आणि अज्ञांचे पालन करावे लागू शकते. त्यानंतर त्यांची 24 तासात सुटका केली जाईल, असेही आश्वासन त्यांना देण्यात आले. तेव्हापासून डिजिटल अटक म्हणजे काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. इथे त्याचे उत्तर आपण मिळवू शकता.
डिजिटल अटक म्हणजे काय?
डिजिटल अटक ही एक आभासी संयम युक्ती आहे. जी सायबर गुन्हेगारांकडून पीडितांना त्यांच्या घरात अडकवण्यासाठी आणि त्यांची फसवणूक करण्यासाठी वापरली जाते. अनेकदा तोतया लोक, सायबर गुन्हेगार कायदेशीर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांप्रमाणे वर्तन करतात. ज्याचा पीडिताला तसूभरही संशय येत नाही. त्यासाठी हे गुन्हेगार/तोतयागिरीत सहभाही लोक पीडिताला अडकविण्यासाठी एआय निर्मित व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉलचा वापर करतात, पीडितांवर त्यांच्या आधार किंवा फोन नंबरशी संबंधित चुकीचे आरोप करतात. (हेही वाचा, PMAY Scheme Fraud: पीएम आवास योजनेचा निधी घेतला आणि नवरा सोडला, 11 महिलांचे प्रियकरासोबत पलायन; महाराजागंज येथील घटना)
हे गुन्हेगार बनावट केस बंद करण्यासाठी (जी कधी झालेलीच नसते) पैशाची मागणी करतात. त्यांच्या अज्ञेचे पीडित व्यक्तीने पालन न केल्यास अटक करण्याची धमकी दिली जाते. घोटाळेबाजांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत पीडितांना व्हिडिओ कॉलवर राहण्यास भाग पाडले जाते. काही घटनांमध्ये, घोटाळेबाज दावा करतात की, पीडितेने बेकायदेशीर पार्सल पाठवले आहेत किंवा प्राप्त केले आहेत, जसे की औषधे किंवा बनावट पासपोर्ट, आणि पीडितेच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना गुंतवण्याची धमकी देखील ते देऊ शकतात. (हेही वाचा, Fake Income Tax Gang Busted: तोतया प्राप्तिकर टोळी 48 तासांत जेरबंद, व्यवसायिकाच्या घरुन बनावट छाप्यात 18 लाखांची रोकड लंपास)
डिजिटल घोटाळा आणि फसवणूक कशी टाळावी?
- अनपेक्षित कॉल्सपासून सावध रहा: कायद्याची अंमलबजावणी/कारवाई करणारे किंवा सरकारी अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या अज्ञात नंबर किंवा व्यक्तींकडून आलेले कॉल किंवा संदेशांपासून सावध रहा.
- वैयक्तिक माहितीचे संरक्षण करा: अनोळखी व्यक्तींसोबत कधीही वैयक्तिक माहिती किंवा पेमेंट तपशील शेअर करू नका.
- शांत राहा: अटक किंवा कायदेशीर कारवाईची धमकी दिली तरीही घाबरू नका किंवा आवेगपूर्ण कृती करू नका.
- संशयास्पद कृतींची तक्रार करा: संशयास्पद कॉल्स किंवा संदेशांची सायबर पोलीसांकडे तत्काळ तक्रार करा.
अशा घटनांची तक्रार करण्यासाठी, [सायबर क्राईम पोर्टल] (http://www.cybercrime.gov.in) ला भेट द्या किंवा हेल्पलाइन नंबर 1930 डायल करा. डिजिटल घोटाळ्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी माहितीपूर्ण आणि सतर्क रहा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)