Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी Bitcoin, Dogecoin यांची किंमत कशी ठरते? कोणते घटक ठरतात कारणिभूत?
अनेकांना उत्सुकता असते की क्रिप्टोकरन्सीची किंमत (Cryptocurrency Price) नेमकी ठरते कशी ? कोणते घटक कारणीभूत असतात. त्यातील चढ उतार कसे असतात? घ्या जाणून.
क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) भलेही आज गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा घटक ठरत असेल. असे असले तरी अद्यापही या करन्सीला हवी तशी मान्यता मिळाली नाही आणि तिचा प्रसारही झाला नाही. भारतात तर क्रिप्टोकरन्सी अधिकृत नाहीच. तरीही क्रिप्टोकरन्सी लोकप्रिय आहे. बिटकॉईन (Bitcoin) डॉजकॉईन (Dogecoin) आदी करन्सी क्रिप्टोकरन्सी प्रकारात मोडतात. अनेकांना उत्सुकता असते की क्रिप्टोकरन्सीची किंमत (Cryptocurrency Price) नेमकी ठरते कशी? कोणते घटक कारणीभूत असतात. त्यातील चढ उतार कसे असतात? घ्या जाणून.
आपल्याला तर माहिती आहेच कोणत्याही गोष्टीची किंमत ही त्याच्या मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरते. अर्थव्यवस्थेतील हे फार जुणे आणि प्रचलीत सूत्र आहे. त्यामुळे हेच सूत्र बिटकॉईन, डॉजकॉईन आणि तत्सम इतरही क्रिप्टोकरन्सीला लागू होते. ज्या वेळी मागणी वाढते तेव्हा क्रिप्टोकरन्सीची किंमत वाढते. मागणी घटली की क्रिप्टोकरन्सीची किंमतही घटते. आपले नेहमीचे चलन नोटा किंवा नाण्यांमध्ये असते. त्याची किंमत रुपयांमध्ये होते. पण क्रिप्टोकरन्सीचे तसे नसते. क्रिप्टोकरन्सी मर्यादीत प्रमाणात निर्मिती केली जाते. पाठिमागील काही दिवसांमध्ये क्रिप्टकरन्सी स्वीकारण्याचे प्रमाण वाढले. त्या प्रमाणात त्याची किंमतही वाढली आहे. (हेही वाचा, Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी, बिटकॉईन ब्लॉकचेन आदी गुंतवणूक किती सुरक्षीत? खरोखरच सुरक्षीत असतो आपला पैसा?)
क्रिप्टोकरन्सीमध्ये नोड काऊंट अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. क्रिप्टोकरन्सीसोबत जोडल्या गेलेल्या वॉलेट्स नंबरला नोड काऊंट म्हणतात. हा इंटरनेट अथवा होमपेजवर दाखवला जातो. त्यावरुन संबंधित क्रिप्टोकरन्सीचे बाजारमूल्य (मार्केट व्हॅल्यू) कळते. तसेच, कॉईन बाजारात तो येणाऱ्या काळात कशी कामगिरी करेन याचाही अंदाज येतो.
क्रिप्टोकरन्सी निर्मितीत उत्पदन मुल्य असते. कोणत्याही क्रिप्टोकॉईनमध्ये डयरेक्ट कॉस्ट आणि कॉस्ट ऑफ रिसोर्स म्हणजेच स्त्रोत आदींवर होणारा खर्च पाहून त्याची किंमत ठरते. कॉइन नर्मितीत जेवढे उत्पादन मूल्य अधिक तेवढी त्या कॉईनची किंमत अधीक असे ते सूत्र असते. (हेही वाचा, Cryptocurrency Blockchain Nodes: क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेन नोड कसे काम करते? जाणून घ्या नेटवर्कविषयी)
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणुकदाराला त्याची सुरक्षीतता आणि फ्यूचर प्रॉस्पेक्ट म्हणजेच भविष्यातील शक्यतांचा विचार केला जातो. ही माहिती ब्लॉकचेनवर मळते. गुंतवणुकदाराने अशा प्रकारचा कॉईन निवडायला हवा जो आपल्या कॉईनला अधिक सुरक्षीतता देतो. व्यावसायिक गुंतवणुकदार ब्लॉकचेन टेक्नोलॉजी संकेत आणि भविष्यावर विश्वास ठेवतात.
प्रोफेशनल क्रिप्टो ट्रेडर्स कॉईनची किंमत ट्रेडवर फार प्रभाव टाकतात. ते मार्कटची दिशा आणि गतीही निश्चित करतात. ज्यामुळे बाजारात रेग्युलेशन होते. त्याला व्हेल अकाऊंट म्हटले जाते. व्हेल अकाऊंटवर बाजारातील सर्वात मोठा घटक सामायिक केला जातो. हे अकाऊंट कॉईनची किंमत वाढविणे आणि कमी करणे यात मोठी भूमिका निभावतो.