7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होऊ शकते 20,484 रुपयांनी वाढ, पाहा संपूर्ण कॅलक्युलेशन

अशा परिस्थितीत एआयसीपीआयने दिलेल्या आकडेवारीनुसार गणना केली जाईल आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होईल.

Money | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना काही दिवसांत सरकारकडून मोठी बातमी मिळू शकते. पुढील आठवड्यापर्यंत केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करू शकते. मात्र, ही पगारवाढ किती होणार, हे सरकारने अद्याप स्पष्ट केलेले नाही. अनेक मीडिया रिपोर्ट्सचा दावा आहे की, AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, 3% DA वाढण्याची अपेक्षा आहे. या वाढीच्या अंदाजाला सरकारने मान्यता दिल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार 2022 चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी हा निर्णय घेण्याची तयारी करत आहे.

यासोबतच केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनातही वाढ करण्याची तयारी सरकार करत आहे. चला तर मग 3% DA वाढल्‍यावर तुमच्‍या पगारात किती टक्के वाढ नोंदवली जाऊ शकते ते जाणून घेऊयात...(वाचा - 7th Pay Commission Update: सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू)

AICPI डेटानुसार ठरवला जातो महागाई भत्ता -

सध्याच्या केंद्र सरकारमध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्के आहे. जर तो 3 टक्के केला तर तो एकूण 34 टक्के होईल. AICPI नोव्हेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार, महागाई आता सुमारे 34 टक्के आहे. त्याच वेळी, AICPI च्या जून 2021 च्या आकडेवारीनुसार, महागाई भत्त्यात 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत एआयसीपीआयने दिलेल्या आकडेवारीनुसार गणना केली जाईल आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होईल.

34 टक्के महागाई भत्ता असल्यास अशी वेतन वाढ होईल -

किमान मूळ वेतनाचे कॅलक्युलेशन -

कमाल मूळ वेतनाचे कॅलक्युलेशन

अशा प्रकारे 34 टक्के महागाई भत्ता असल्यास वरील कॅलक्युलेशन नुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारवाढ होणार आहे.