Shocking! YouTube ट्यूटोरियल पाहून पतीने घरीचं केली पत्नीची प्रसूती; महिलेसह बाळाचा मृत्यू
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) येथील वैद्यकीय अधिकारी रथिका यांनी पोचमपल्लीजवळील पुलीमपट्टी येथील रहिवासी लोगनायकी यांच्या मृत्यूबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Tamil Nadu: तामिळनाडू (Tamil Nadu) च्या कृष्णगिरी (Krishnagiri) येथील 27 वर्षीय महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. पतीने YouTube वर पाहून आपल्या पत्नीचा घरी नैसर्गिक प्रसूतीचा प्रयत्न केला. पतीने नाळ नीट न कापल्याने महिलेला रक्तस्त्राव झाला. यात तिचा मृत्यू झाला.
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) येथील वैद्यकीय अधिकारी रथिका यांनी पोचमपल्लीजवळील पुलीमपट्टी येथील रहिवासी लोगनायकी यांच्या मृत्यूबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोगनायकी यांचे पती मधेश यांनी पत्नीला प्रसूती वेदना होऊ लागल्यानंतर यूट्यूबवर पाहून तिची प्रसूती केली. (हेही वाचा - Nepal Bus Accident: नेपाळ येथे बसचा दुर्दैवी अपघात, सात प्रवाशांनी गमावला जीव)
प्रसूतीदरम्यान नाभीसंबधीचा दोर नीट कापला गेल्याने महिलेला रक्ताची तीव्र कमतरता निर्माण झाली. तिला बेशुद्ध अवस्थेत पीएचसीमध्ये आणण्यात आले मात्र, रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 174 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.