UPSC Recruitment 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून Lady Medical Officer सह इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी; उमेदवार 1 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज

ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल, ते उमेदवार 1 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.

UPSC Representational Image (Photo Credits: PTI)

UPSC Recruitment 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission, UPSC) विविध पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार लेडी मेडिकल ऑफिसर (Lady Medical Officer), प्रिन्सिपल (Principal), डिझाईन ऑफिसर (Design Officer) आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 एप्रिल 2021 आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा असेल, ते उमेदवार 1 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार 2 एप्रिल 2021 पर्यंत फी जमा करू शकतात.

आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लेडी मेडिकल ऑफिसरच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 33 वर्षे असावे. तसेच प्रिंसिपल डिजाइन ऑफिसर पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 45 वर्षे, तर डायरेक्टर जनरल टेक्निकल पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 45 वर्षोचे असावेत. याशिवाय असिस्टेंट आर्किटेक्ट, ऑफिस आणि चीफ आर्टिकेट या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय अनुक्रमे 45 वर्षे आणि 35 वर्षे असावे. (वाचा - JEE Main Admit Card 2021: जेईई मेन मार्च सत्राच्या परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी; jeemain.nta.nic.in लिंकवरून करा डाउनलोड)

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लेडी मेडिकल ऑफिसर पदासाठी 2, प्रिंसिपल डिजाइन ऑफिसर इलेक्ट्रिकल 1, डिप्टी डायरेक्टर जनरल टेक्निकल 1, असिस्टेंट आर्किटेक्ट, ऑफिस आणि चीफ आर्किटेक्ट च्या एका जागेसाठी नेमणुका करण्यात येतील.

दरम्यान, प्रिंसिपल डिजाइन ऑफिसर पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगची पदवी घेतलेली असावी. या व्यतिरिक्त डिप्टी डायरेक्टर जनरल टेक्नीशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून नेव्हल आर्किटेक्चरमध्ये पदवी मिळवलेली असणे आवश्यक आहे. दरम्यान, यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.