Thane Municipal Corporation Jobs: ठाणे महानगरपालिकेत होणार 1900 हून अधिक लोकांची नोकर भरती; जाऊन घ्या पदांची नावे व कुठे करावा अर्ज

या दरम्यान अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योग बंद पडले. आता एक सकारात्मक बातमी म्हणजे, ठाणे महानगरपालिके (TMC) मध्ये नोकर भरती (Recruitment) सुरु झाली आहे.

(Photo credit: archived, edited, representative image)

कोरोना विषाणू (Coronavirus) संकटकाळात राज्यासह नागरिकांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. या दरम्यान अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योग बंद पडले. आता एक सकारात्मक बातमी म्हणजे, ठाणे महानगरपालिके (TMC) मध्ये  नोकर भरती (Recruitment) सुरु झाली आहे. ठाणे महानगरपालिकेने नर्स, मेडिकल ऑफिसर, इंटेन्सिव्हिस्ट व इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. 11 जुलै 2020 रोजी किंवा त्यापूर्वी पात्र उमेदवार ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. एकूण 1901 पदांसाठी ही भरती असणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार असून, 6 महिने किंवा कोरोनाचा संसर्ग संपेपर्यंत या नोकऱ्या उपलब्ध असतील.

पदांची नावे –

इंटेन्सिव्हिस्ट - 45

वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) - 240

वैद्यकीय अधिकारी (आयुष) - 240

नर्स - जीएनएम - 750 पदे

नर्स एएनएम - 450 पोस्ट

सिस्टम प्रशासक - 6 पदे

बायोमेडिकल अभियांत्रिकी - 03 पोस्ट

बायोमेडिकल मदतनीस – 03 पडे

कार्यकारी रुग्णालय ऑपरेशन - 30 पदे

एचआर व्यवस्थापक -09 पोस्ट

रिसेप्शनिस्ट - 30 पोस्ट

DECHO तंत्रज्ञ - 03 पोस्ट

वैद्यकीय ट्रान्सक्रिप्शनिस्ट – 12 पोस्ट

एक्स-रे तंत्रज्ञ – 15 पदे

डायलिसिस टेक्निशियन -09 पोस्ट्स

ईसीजी तंत्रज्ञ - 06 पोस्ट

सीएसएसडी तंत्रज्ञ - 06 पोस्ट

एमजीपीएस तंत्रज्ञ - 12 पदे

प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 10 पदे

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कनिष्ठ) - 10 पदे

हार्डवेअर व नेटवर्किंग अभियंता – 12 पदे

शैक्षणिक पात्रता-

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरातीमध्ये ते नमूद केले आहे)

वयाची अट-

खुल्या प्रवार्गासाठी 38 वर्षे व मागास प्रवार्गासाठी 43 वर्षे अशी अट आहे, मात्र एखाद्या पदासाठी प्रतिसाद कमी असल्यास त्या पदाच्या वयाची अट शिथिल करण्यात येईल. (हेही वाचा: राज्यातील स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी सरकारने सुरु केले ‘महाजॉब्स’ पोर्टल; जाणून घ्या कशी करावी नोंदणी

दरम्यान, कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालीकेच्या क्षेत्रात  ग्लोबल इम्पेक्ट हब, 1000 खाटांचे रुग्णालय, रुस्तुमजी कॉम्प्लेक्स, बाळकुम रोड, ठाणे, मौजना अब्दुल कलाम आझाद स्टेडियम कौसा, मुंद्रा येथे 406 बेड्सचे व  खारेगाव कळवा येथे 430 बेडचे कोविडसाठी DCHC उभारण्याची कार्यवाही म्हाडातर्फे सुरु आहे. त्यासाठी या पदांची भरती सुरु केली आहे.