IPL Auction 2025 Live

SSC Recruitment 2019: मोदी सरकारचं आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना नवं गिफ्ट, सरकारी नोकरीची पहिली बंपर नोकर भरती जाहीर, 25 फेब्रुवारी पर्यंत करू शकता अर्ज

यामध्ये सवर्ण उमेदवारांना मिळणार 10% आरक्षणाचा फायदा

SSC Recruitment 2019 |Image Used for Representational Purpose (Photo Credits: Pixabay)

SSC Bharti 2019: नरेंद्र मोदी सरकारने आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election) यांचं लक्ष्य समोर ठेवत नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना(Economically Weaker Section)  10 % आरक्षण दिलं आहे. हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये देण्यात आलं आहे. आता या आरक्षणाचा फायदा मिळवण्यासाठी मोदी सरकारकडूनच पहिली सरकारी नोकर भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. SSC म्हणजेच  स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये इंजिनियर या पदासाठी ही नोकरभरती होणार आहे. महाराष्ट्र राज्यात आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10% आरक्षण लागू

कोणत्या पदासाठी होणार नोकर भरती ?

ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)

ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)

ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)

ज्युनिअर इंजिनिअर (क्वांटिटी सर्व्हिंग आणि कॉन्ट्रॅक्ट)

शैक्षणिक पात्रता काय असावी?

सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

वयाची अट काय?

01 ऑगस्ट 2019 रोजी 27/30/32 वर्षांपर्यंत [SC/ST जातीतील उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट, OBC जातीतील उमेदवारांसाठी 3 वर्षे सूट आहे.]

प्रवेश फी काय असेल?

General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला,माजी सैनिक यांना प्रवेश फी नाही]

परीक्षा (CBT):

पेपर I: 23 ते 27 सप्टेंबर 2019

पेपर II: 29 डिसेंबर 2019

अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी 2019 असेल. ऑनलाईन माध्यमातून ssc.nic.in या वेबसाईटवर अर्ज भरता येईल.

आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय लोकांना आरक्षण देऊन सरकारने साऱ्यांनाच खुश ठेवण्याचा मास्टरप्लॅन खेळल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रासह देशातील 8 राज्यांनी हे सवर्ण आरक्षण लागू केलं आहे.