Maharashtra FYJC CET 2021 Exam Date: 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा 21 ऑगस्टला; इथे पहा परीक्षेचं स्वरूप ते अर्जाचे अपडेट्स
सकाळी 11 ते 1 यावेळेमध्ये ही परीक्षा होईल. ही परीक्षा ऐच्छिक आहे.
महाराष्ट्र शिक्षण बोर्डाकडून यंदा 10वीचा निकाल अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने लावला असला तरीही विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेशासाठी समान संधी मिळावी याकरिता वैकल्पिक सीईटी परीक्षेचं (Maharashtra FYJC CET 2021 Exam) आयोजन केले आहे. या परीक्षेची तारीख आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी जाहीर केली आहे. यंदा ही परीक्षा 21 ऑगस्ट दिवशी होणार आहे. सकाळी 11 ते 1 यावेळेमध्ये ही परीक्षा होईल. ही परीक्षा ऐच्छिक आहे. FYJC Online Admission Process: अकरावी प्रवेशासाठी होणाऱ्या CET परीक्षेसाठी 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात.
वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, CET ऑफलाइन स्वरूपाची असेल व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी(MCQ)असेल असे सांगितले आहे.राज्य मंडळाच्या 10वी च्या अभ्यासक्रमावर आधारित या परीक्षेला इंग्रजी, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील. परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी मंडळाच्या http://cet.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाला भेट घ्यावी. CET प्रश्नपत्रिकेत कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 ला वगळण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न नसतील असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. (11th Std CET Format: 11 वी प्रवेशासाठी सीईटी परिक्षेचा पॅटर्न जाहीर, जाणून Exam बद्दल अधिक माहिती).
वर्षा गायकवाड ट्वीट
यंदाचा दहावीचा निकाल 16 जुलै दिवशी जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा 2020-21 चा निकाल 99.96% लागला आहे. यावर्षी देखील मुलींनी निकालामध्ये बाजी मारलेली आहे. दरम्यान बोर्डाने कोविड च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित पाहता दहावीची बोर्डाची परीक्षा न घेता 9वीचे मार्क्स आणि 10वीचे अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क्स यांना मिळून निकाल लावला आहे. पण त्यावर खूष नसलेल्यांना श्रेणी सुधारण्याची देखील संधी मिळणार आहे.