Maharashtra Board SSC, HSC Exam Timetable: दहावी, बारावी 2022 परीक्षांचं विषयांनुसार वेळापत्रक जारी; mahahsscboard.in वरून करा डाऊनलोड

25 फेब्रुवारी ते 14 मार्च दहावीच्या तोंडी परीक्षा होणार आहे.

Exam | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Board Class 10, 12 Date sheet: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वी यंदाच्या दहावी,बारावी परीक्षा 2022 च्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज (21 डिसेंबर) बोर्डाने विषयांनुसार सविस्तर वेळापत्रक जारी केले आहे. दहावीच्या परीक्षेची (SSC Board Exam) सुरूवात 15 मार्च दिवशी भाषेच्या विषयाने होणार आहे तर शेवट 4 एप्रिल दिवशी भूगोल या विषयाने होणार आहे. तर बारावीची परीक्षा (HSC Board Exam) 4 मार्च दिवशी इंग्रजी विषयाने होणार असून 30 मार्च दिवशी पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्र/ भूगोल/ समाजशास्त्र या विषयाने होणार आहे. दरम्यान तुमच्या शाखेनुसार आणि इयत्तेनुसार सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी, डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना mahahsscboard.in वर भेट द्यावी लागणार आहे.

यंदा दहावी, बारावीची बोर्ड परीक्षा ऑफलाईन स्वरूपात आणि एकाच सत्रात होणार असल्याचं बोर्डाने स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या सावटाखाली सुरक्षित वातावरणामध्ये परीक्षा पार पाडण्याचं मोठं आव्हान यंडा बोर्डासमोर असणार आहे. त्या अनुषंगाने बोर्डाकडून खबरदारी देखील घेतली जाणार आहे.

इथे पहा आणि डाऊनलोड करा दहावी, बारावीचं सविस्तर वेळापत्रक

दहावी 2022 ची बोर्ड परीक्षा वेळापत्रक

बारावी 2022 (वोकेशनल) ची बोर्ड परीक्षा वेळापत्रक

बारावी 2022 (जनरल/बायफोकल) ची बोर्ड परीक्षा वेळापत्रक

लेखी परीक्षेसोबतच यंदा 14 फ्रेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत बारावीच्या तोंडी परीक्षा होणार आहे. 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दहावीच्या तोंडी परीक्षा होणार आहे. यंदा दहावीचे पुर्नपरीक्षा, खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार साठी परीक्षा देणारे विद्यार्थी आता नियमित शुल्कासह 26 डिसेंबर पर्यंत अर्ज करू शकणार आहेत तर विलंब शुल्क सह 1 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतील. तर बारावीचे विद्यार्थी केवळ आता विलंब शुल्कासह 28 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकणार आहेत.