JEE (Mains) 2021 Exams Date: जेईई मेन परीक्षा फेब्रुवारी ते मे दरम्यान होणार, पहिल्या सत्राचे पेपर 23 ते 26 मध्ये आयोजित- रमेश पोखरियाल निशंक

Ramesh Pokhriyal (Photo Credits-Twitter)

JEE (Mains) 2021 Exams Date: केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhriyal Nishank) यांनी जेईई मेन 2021 परीक्षेसंदर्भात घोषणा केली आहे. शिक्षण मंत्र्यांनी असे म्हटले आहे की, जेईई मेन परीक्षा 2021 चे पहिले सत्र 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2021 दरम्यान पार पडणार आहे. यंदाच जेईई मे परीक्षा वर्षातून चार वेळा होणार आहे. म्हणजेच फेब्रुवारी पासून दुसरे सत्र, तिसरे एप्रिल आणि चौथे मे मध्ये पार पडणार आहे. विविध वेळी पार पडणारी वेगवेगळ्या राज्यांच्या बोर्डाची परीक्षा जेईई मेन परीक्षांच्या आयोजनावेळी अडथळा आणू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आधी इंजिनिअरिंग प्रवेश परिक्षा वर्षातून दोन वेळेस आयोजित केली जात होती.

पोखरियाल यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना असे म्हटले की, एनटीए द्वारे चार सत्रांची परीक्षा विद्यार्थ्यांना आपल्या सुविधेनुसार देता येणार आहे. पहिले सत्र 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2021 मध्ये पार पडणार आहे. त्यानंतर मार्च. एप्रिल आमि मे मध्ये सुद्धा परीक्षा होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे अभ्यासाठी पुरेसा वेळ असणार आहे.(ICSI CS June 2021 Exam चं वेळापत्रक Icsi.edu वर जाहीर; इथे पहा नव्या, जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षेच्या तारखा)

 Tweet:

तसेच जेईई मेन परीक्षा 2021 एकूण 13 भाषांमध्ये आयोजित केली जाणार आहे. त्यामध्ये इंग्रजी, गुजराती, बंगाली, आसामी, कन्नड, मराठी, मल्याळम, ओडिसी, तमिळ, उर्दू, तेलगू आणि पंजाबी भाषेचा समावेश असणार आहे. आतापर्यंत जेईई मेन परीक्षा इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषांमध्येच घेतली जात होती.(GATE 2021 Exam Schedule: पेपर प्रमाणे gate.iitb.ac.in वर IIT Bombay कडून सविस्तर वेळापत्रक जारी; 5 फेब्रुवारी पासून परीक्षा)

प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्न बद्दल पोखरियाल यांनी असे म्हटले की, विविध शिक्षण बोर्डासोबत चर्चा केल्यानंतर एनटीएने एक निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिकेत 90 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामधील 75 प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना देणे अनिवार्य आहे. 15 ऑप्शनल प्रश्न असणार आहेत. ऑप्शनल प्रश्नांसाठी निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. चारही सत्रांमधील उत्तम गुणांचा आधारावर मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे.