JEE Main 2021 ची आज परीक्षा पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना जाहीर
ही परीक्षा आज संपूर्ण देभरात आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा दोन स्लॉट एक सकाळी आणि दुसरी दुपारी पार पडणार आहे.
JEE Main 2021: संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई मे 2021 एप्रिल सत्र परीक्षेचा आज तिसरा दिवस आहे. ही परीक्षा आज संपूर्ण देभरात आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा दोन स्लॉट एक सकाळी आणि दुसरी दुपारी पार पडणार आहे. जवळजवळ 1.5 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार असल्याची अपेक्षा आहे. याच दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) यांनी महाराष्ट्रातील पुराची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांसाठी एक नोटीस जाहीर केली आहे.(Maharashtra FYJC CET 2021 Exam Date: 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा 21 ऑगस्टला; इथे पहा परीक्षेचं स्वरूप ते अर्जाचे अपडेट्स)
महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाऊस, भूस्खलन आणि पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. एनटीएने त्या सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देत त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षेचे आयोजन केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पुरामुळे फटका बसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये अशा विद्यार्थ्यांचा समावेश आहे जे 20 जुलै, 22 जुलै आणि आज किंवा 27 जुलै रोजी परीक्षेसाठी बसणार होते.(Maharashtra Scholarship Exam 2020-21 Revised Date: 5वी, 8वी ची शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्टला; मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती)
कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा शहरातील परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना आपली परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. अशातच एनटीए कडून या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे नवी तारीख जाहीर केली जाणार आहे. तर एनटीए सोबत संपर्क करण्यासाठी 011-40759000 हा दूरध्वनी क्रमांक आणि jeemain@nta.ac.in यावर ईमेल करता येणार आहे. अन्य विद्यार्थ्यांसाठी परीक्षा सकाळच्या वेळेस 9 वाजता आणि दुपारी 3 वाजता निर्धारित वेळेत सुरु होणार आहे.