फेसबूकला हवेत २०,००० कंटेट मॉडरेटर्स, ४ लाख पगार
पदवीधरांसाठी मोठी संधी
फेसबूक हे तरूणाईमधील लोकप्रिय सोशल मीडिया माध्यम आहे. मात्र मागील काही दिवसांपासून फेसबूकशी निगडीत काही वाद रंगल्यामुळे आता फेसबूकने त्यांच्या पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. फेसबूकच्या नव्या पॉलिसीनुसार आता न्यूज फीडवर नेमक्या कोणत्या पोस्ट दिसणार याबाबतची बंधनं वाढली आहेत.
फेसबूकवर दहशतवाद, नकारात्मकता पसरवणार्या गोष्टी, अश्लिल व्हिडिओ ,माहिती हटवण्यासाठी खास कंटेट मॉडरेटर्स नियुक्त करण्यात येणार आहे. २० हजार उमेदवार नियुक्त करण्यात येणार आहेत.
भारतीय भाषिक उमेदवारांना सुवर्णसंधी
कंटेड मॉडरेटर्स या पदासाठी फेसबुकने जेनपॅक्टला कंत्राट दिलं. या कंपनीद्वारा मराठी, पंजाबी, तमीळ, कन्नड, उडिया, नेपाळी अशा प्रादेशिक भाषा लिहता, वाचता, बोलता येणार्या उमेदवारांना फेसबूकसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. जेनपॅक्टने ऑनलाईन एम्प्लॉयमेंटद्वारा अर्ज मागावले आहे.
पगार किती ?
फेसबूकमध्ये कंटेड मॉडरेटर म्हणून रूजू होणार्या उमेदवाराला अश्लील किंवा समाजात तेढ निर्माण होणार्या माहिती आणि व्हिडिओवर नजर ठेवायची आहे. आत्महत्येच्या प्रयत्नाचा, लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतच्या व्हिडिओवर कारवाई केली जाणार आहे.
कंटेट मॉडरेटरला वर्षाला सुमारे २.५ लाख ते ४ लाख रूपयाचं पॅकेज मिळणार आहेत. पगारासोबतच काही खास सुविधाही मिळणार आहेत.