पुढील वर्षीपासून पदवीच्या प्रवेशप्रक्रियेत CET च्या गुणांसोबत 12वीचे गुण देखील महत्त्वाचे; पहा सरकारचा नवा नियम
या दोन्हींच्या मार्क्सना प्रत्येकी 50% मूल्य असणार आहे.
महाराष्ट्रामध्ये पदवीच्या शिक्षणासाठी अनेक प्रोफेशनल कोर्ससाठी सीईटी (CET Exam) परीक्षा द्यावी लागते. पण पुढील वर्षापासून आता पदवीच्या प्रवेशाच्या वेळेस विद्यार्थ्यांचे 12वीचे गुण देखील सीईटीच्या मार्कांसोबत पाहिले जाणार आहे. या दोन्हींच्या मार्क्सना प्रत्येकी 50% मूल्य असणार आहे. आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ही माहिती दिली आहे.
बारावीनंतर विविध अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र सीईटी सेल सुमारे 16 सीईटी परीक्षांचं आयोजन करते. व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी विद्यार्थी आपलं बरचस लक्ष सीईटी परीक्षांवर ठेवतात आणि बारावीच्या परीक्षेकडे दुर्लक्ष करतात. यामुळे बारावी बोर्ड परीक्षेचे महत्त्व कमी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारपुढे गेल्या काही वर्षांपासून होता. त्यावर आता निर्णय झाला आहे. हे देखील नक्की वाचा: MHT CET 2022 Timetable: सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सविस्तर .
यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये एमएचटी सीईटी (MHT CET) आणि अन्य परीक्षा जुलै नंतर होणार आहेत. परीक्षा उशिराने होत असल्या तरीही निकाल लगेजच दहा दिवसात लावण्याचा प्रयत्न आहे. MHT CET Exam 2022 साठी PCM ग्रुपची परीक्षा येणाऱ्या 05 ते 11 ऑगस्ट, 2022 या दरम्यान घेण्यात येणार आहे. तर PCB ग्रुपची परीक्षा ही 12 ते 20 ऑगस्ट, 2022 दरम्यान होणार आहे.