CBSE Private, Compartment Exams 2021 Admit Cards Released: 25 ऑगस्ट पासून सुरू होणार्‍या परीक्षांसाठी cbse.nic.in वरून अशी डाऊनलोड करा अ‍ॅडमीट कार्ड्स

ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा स्कोअर सुधारायचा आहे किंवा जे परीक्षा देऊ शकलेले नाहीत असे विद्यार्थी या परीक्षेद्वारा अजून एक संधी मिळणार आहे.

online education ((Photo Credits: Pexels)

सीबीएसई (Central Board of Secondary Education) कडून प्रायव्हेट कॅन्डिडेट्स आणि रेग्युलर कॅन्डिटेड्स विद्यार्थी जे Compartment Cum Improvement Exam ला सामोरे जाणार आहेत त्यांच्यासाठी हॉल तिकीट्स, अ‍ॅडमीट कार्ड्स (Admit Cards) जारी करण्यात आली आहेत. यंदा या परीक्षा 10वी,12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 25 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा स्कोअर सुधारायचा आहे किंवा जे परीक्षा देऊ शकलेले नाहीत असे विद्यार्थी या परीक्षेद्वारा अजून एक संधी मिळणार आहे. (नक्की वाचा: CBSE Class 10, 12 Offline Exam Update: यंदा सीबीएसई ची ऑफलाईन परीक्षा देणार्‍यांसाठी बोर्डाने जारी केल्या खास सूचना).

दरम्यान काही प्रायव्हेट विद्यार्थ्यांकडून या परीक्षा देखील विरोध दर्शवण्यात आला होता पण बोर्डाने अशा परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.यंदा रेग्युलर विद्यार्थ्यांना 10वी,12वी ची लेखी परीक्षा न देता अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने निकाल दिला आहे.पण निकालाचा हा पर्याय प्रायव्हेट मोड च्या विद्यार्थ्यांसाठी नव्हता. यंदा सीबीएससीने 30% अभ्यासक्रम कमी केला आहे. यंदा परीक्षेमध्ये MCQ-based questions अधिक असणार आहेत. अधिकृत संकेतस्थळावर यंदा जारी करण्यात आलेल्या सॅम्पल पेपर प्रमाणेच या परीक्षेचे पेपर असतील. नक्की वाचा: CBSE Board Revised Syllabus Update: 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित अभ्यासक्रम जाहीर; cbseacademic.nic.in वर पहा Term Wise Syllabus.

सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी अ‍ॅडमीट कार्ड्स कशी डाऊनलोड करणार?

25 ऑगस्टला पहिला पेपर English Core आहे. improvement exams चा शेवटचा पेपर 15 सप्टेंबरला असणार आहे. 10.30 ते 1.30 या एकाच शिफ्ट मध्ये परीक्षा होणार आहे. दरम्यान अ‍ॅडमीट कार्ड वर परीक्षेची तारीख, वेळ,परीक्षा केंद्र यांची माहिती दिलेली असेल. परीक्षेला जाताना अ‍ॅडमीट कार्ड्स सोबत ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी ही ई- अ‍ॅडमीट कार्ड्सची प्रिंट आऊट नक्की ठेवा.