Business Ideas For Unemployed People: नोकरी गेली? नो टेन्शन! बेरोजगार महिला, पुरुषांसाठी 10 बिझनेस आयडिया

कोणताही व्यवसाय करण्यासाठी आपली अभिरुची, त्यातील आपले ज्ञान, व्यवसायाचे स्थान, ग्राहक, क्षेत्र, भांडवल या सर्वांचा विचार करावा लागतो.

Business Ideas | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोरना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊन (Lockdown) असो, आर्थिक मंदी असो वा इतर कोणतेही संकट. नोकरदार व्यक्तीवर नेहमीच त्याची नोकरी जाण्याची टांगतील तलवार लटकत असते. लॉकडाऊन काळात तर अनेकांना ही गोष्ट अनुभवायला, पाहायला मिळाली. त्यामुळे अनेकांनी 'नोकरी नको व्यवसाय हवा' अशी भूमिका घेत नवा मार्गही चोखाळला. अशाच लोकांसाठी म्हणजे ज्यांनी नोकरी गेली आहे, जे नोकरी शोधून कंटाळले आहेत किंवा ज्यांच्या मनामध्ये व्यवसाय करण्याची उर्मी आहे. परंतू, नेमका कोणता व्यवसाय सुरु करावा याबाबत संभ्रम आहे. अशा सर्व मंडळींसाठी स्त्री, पुरुष, तरुण, तरुणी यांच्यासाठी आम्ही इथे काही व्यवसायाच्या भन्नाट कल्पना (Business Ideas For Unemployed People) देत आहोत. या बिझनेस आयडिया ((Business Ideas) वापरुन तुम्ही तुमच्या आर्थिक उन्नती आणि यशाचा मार्ग निवडू शकता.

व्यवसायाच्या संकल्पना (Business Ideas)

व्यामशाळा (Gym)

अलिकडील काळात नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती झाली आहे. त्यातही लॉकडाऊन काळात अनेकांन आपल्या आरोग्याचे महत्त्व कळले आहे. त्यामुळे येत्या काळात व्यायामशाळा म्हणजेच जिमला अधिक महत्त्व येणार आहे. त्यामुळे आवश्यक प्रशिक्षण घेऊन आपण हा व्यवसाय सुरु करु शकता.

किराणा माल दुकान (Grocery Store)

कोरोना व्हायरस संकटामुळे लॉकडाऊन काळानंतर नागरिकांच्या जीवनशैलीत मोठा बदल घडून येणार आहे. त्यामुळे नागरिक घरातील वाणसामान भरण्यासाठी लांब पल्ल्याचा किंवा विशिष्ट दुकानांचाच अग्रह सोडून देतील. त्यामुळे सहाजिकच ते आपल्या घराजवळ किंवा मालाची घरपोच सेवा देणाऱ्या दुकानांना प्राधान्य देतील. अशा वेळी ग्राहकांना चांगली सेवा देऊन आपण या व्यवसायात मुसंडी मारु शकता.

गेम पार्लर ( Game Parlor)

आजच्या डिजिटल युगात नागरिकांचे खेळ, आवडनिवड मोठ्या प्रमाणावर बदलल्या आहेत. नागरिकांचा स्क्रीन टाईम प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या संधिचा वापर करुन एखादे गेम पार्लर सुरु केले तरीसुद्धा चांगले उत्पन्न मिळू शकते. (हेही वाचा, कामगार दिन 2019: संस्था रजिस्ट्रेशन किंवा नवीन संस्था कशी सुरु करावी? जाणून घ्या सर्व माहिती)

आइस्क्रीम पार्लर (Ice Cream Parlor)

आइस्क्रीम पार्लर हा जवळपास सर्वांच्याच आवडीचा विषय. सर्वसाधारण सर्वे जरी घेतला तरी त्याचा निष्कर्ष निघेल की नागरिकांना आइस्क्रिम प्रचंड आवडते. त्यामुळे एखादे चांगले लोकेशन पाहून आपण आइस्क्रिम पार्लर सुरु केल्यास फायदा होऊ शकतो.

ज्वेलरी शॉप (Jewelery Shop)

खऱ्या ज्वेलरी दागिण्यांचे शॉप सुरु करणे तसे बरेच खर्चिक. त्यामुळे किमान या काळात तरी ते धाडस करणे फारसे ठिक नव्हे. परंतू, आपण बेेटेक्स ज्वेलरी म्हणजेच नकली दागिण्यांचे शॉप तर नक्कीच सुरु करु शकता. असे दागिणे वापरणाऱ्या मंडळींची संख्या कितीतरी मोठी आहे. त्यामुळे हा व्यवसाय सुरु करुन पाहण्यासही काही हरकत नाही.

विमा सल्लागार (Insurance Consultant)

आजच्या बदलत्या जीवनशैलीत विमा ही एक निकराची गोष्ट होऊन बसली आहे. मग यात जीवन विमा, अपघाती विमा, आरोग्य विमा, अकाली मृत्यू आला तरचा विमा, संपत्ती, मालमत्ता, वाहन, मौल्यवान गोष्टी, पिकं यांबाबतचा विमा, व्यवसाय विमा असे विम्याचे अनेक प्रकार आहेत. अनेक नागरिकांना विमा घ्यायचा असतो. परंतू, तो कसा आणि कोणता घ्यायचा याबाबत माहिती नसते. त्यामुळे या क्षेत्रातही प्रचंड संधी आहे हे निश्चित. (हेही वाचा, Buffalo Breeding: काय सांगता? म्हैस माजावर येत नाही? असा ओळखा म्हशीचा माज)

फ्रीलान्सींग प्रोग्रामिंग/वेबसाईट (Freelancing Programming / Website)

इंटरनेट आल्यापासून देशात डिजिटल क्रांती झाल्याचे पाहायला मिळते. अशा वेळी अनेक व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची ओळख डिजिटल करण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळे अनेक संस्था, संघटना, व्यावसायिक, व्यक्ती यांना आपली वेबसाईट असावी असे नेहमी वाटत असते. परंतू, योग्य दरात, योग्य डिजाईन करुन देणारी व्यक्ती न भेटल्याने या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी हा एक नवा व्यवसाय विचारात घेऊन आपण यात प्रगती करु शकता.

केटरींग व्यवसाय (Catering Business)

जग कितीही बदललं तरी भुकेला पर्याय नाही. नागरिकांनी कितीही हेल्थ कॉन्शिअस राहायचं म्हटले आणि आहारावर नियंत्रण ठेवलं तरीही. त्यामुळे जगातल्या कोणत्याही ठिकाणी म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी मानवी निवास आहे त्या ठिकाणी या व्यसायाला कुठेच मरण नाही. त्यामुळे हाही एक व्यवसायाचा पर्याय विचारात घ्यायला हरकत नाही.

पाळणाघर, बेबी सीटींग ( baby Seating)

वाढती महागाई, बदलती स्वप्न, महत्त्वाकांक्षा यामुळे आपले मासिक आर्थिक उत्पन्न वाढविण्यावर सध्या सगळ्यांचाच भर आहे. त्यामुळे नवरा-बायको दोघेही नोकरी, अथवा व्यवसायात व्यग्र असतात. घरजे ज्येष्ठ नागरिकहही व्यवसाय, नोकरी करत असतात. त्यामुळे घरातील लहान मुलांच्या संगोपणाचा प्रश्न अनेकांना सोडवावा लागतो. आपण अशा लोकांसाठी तारणहार बणू शकता. शहरांमध्ये पाळणाघर हा व्यवसाय आपण नक्कीच चांगला चालवू शकता. ज्यातून आपल्याला आर्थिक फायदाही होईल आणि समाजसेवाही करता येईल.

अर्थात व्यवसायाची आयडिया मिळाली म्हणून लगेच व्यवसाय सुरु करण्यात काहीच हाशील नाही. कोणताही व्यवसाय करण्यासाठी आपली अभिरुची, त्यातील आपले ज्ञान, व्यवसायाचे स्थान, ग्राहक, क्षेत्र, भांडवल या सर्वांचा विचार करावा लागतो. त्यामुळे इथली माहिती वाचून व्यवसाय सुरु करायचा असल्यास स्वत:च्या जबाबदारीवर सुरु करा. त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. कुटुंबातील अनुभवी, ज्येष्ठ मंडळींचा सल्ला घ्या आणि मगच पुढचे पाऊल टाका.