BECIL Recruitment 2020: डेटा एन्ट्री ऑपरेटर, ऑफिस असिस्टेंटसह 749 पदांवर नोकर भरती, जाणून घ्या अधिक
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड कडून ऑल इंडिया इंस्टिट्युट एम्स भोपाळ आणि ऑल इंन्स्टिट्युट एम्स गुवाहाटी मध्ये विविध पदांसाठी नोकर भरतीची घोषणा केली आहे.
BECIL Recruitment 2020: ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड कडून ऑल इंडिया इंस्टिट्युट एम्स भोपाळ आणि ऑल इंन्स्टिट्युट एम्स गुवाहाटी मध्ये विविध पदांसाठी नोकर भरतीची घोषणा केली आहे. या अंतर्गत कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर, लोअर डिव्हिजन क्लर्क, ऑफिस असिस्टंट, लॅब असिस्टंट, अॅनाटॉमी डिसेक्शन हॉल अटेंडस आणि ज्युनिअर वॉर्डन पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे.(BOI Recruitment 2020 for Officer Posts: बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; bankofindia.co.in वर करा 21 डिसेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज!)
या नोकर भरती अंतर्गत एकूण 749 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ www.becil.com येथे ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तर नोकरभरती संदर्भात येथे अधिक जाणून घ्या.
BECIL Recruitment 2020 नोकरभरती रिक्त पद
प्रोगाम असिस्टेंट- 1 पोस्ट
डाटा एंट्री ऑपरेटर- 3 पोस्ट
एलडीसी- 2 पोस्ट
ऑफिस अटेंडेंट एमटीएस- 3 पोस्ट लॅब अटेंडेंट- 3 पोस्ट
हॉल अटेंडेंट- 2 पोस्ट
लेब्रोरेटरी असिस्टेंट- 4 पोस्ट
जेआर वार्डन- 2 पुरुष, 2 महिला
महत्वाच्या तारख्या
>>एम्स भोपाळ येथे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 26 डिसेंबर 2020 दिली गेली आहे.
>>एम्स गुवाहाटी मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 27 डिसेंबर 2020 असणार आहे.(IBPS SO Recruitment 2020: बँकेत 645 Specialist Officer पदाच्या भरतीसाठी सोमवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख; असा करा अर्ज)
प्रोग्राम असिस्टंटसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून ग्रॅज्युऐशन डिग्री पूर्ण केलेली असावी. या व्यतिरिक्त डेटा एन्ट्री ऑपरेटर पोस्टसाठी अर्ज करणाऱ्या उमेदावाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून 12वी पास केली असावी. तर ऑफिस अटेंडेंट, एमटीएसच्या पोस्टवर अर्ज करण्यासाठी 8 वी पास असणे अनिवार्य आहे. या व्यतिरिक्त लॅब अटेंडेंटसाठी 12 वी पास असणे आवश्यक आहे.