Earthquake: राजस्थान आणि अरुणाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के; 'इतकी' होती रिश्टर स्केलची तीव्रता

दुपारी दोनच्या सुमारास 10 किमी खोलीवर भूकंप झाला. त्याचवेळी भूकंपाची तीव्रता 4.2 नोंदवण्यात आली. या भूकंपात कोणतीही हानी झाली नाही.

Earthquake Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Earthquake: राजस्थान (Rajasthan) आणि अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले आहेत. अरुणाचलच्या चांगलांगमध्ये भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे, तर राजस्थानच्या बिकानेरमध्ये 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता कमी असल्याने सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. अरुणाचलच्या चांगलांगमध्ये दोन दिवसांपूर्वी गुरुवारीही भूकंपाचे धक्के जाणवले होते. दुपारी दोनच्या सुमारास 10 किमी खोलीवर भूकंप झाला. त्याचवेळी भूकंपाची तीव्रता 4.2 नोंदवण्यात आली. या भूकंपात कोणतीही हानी झाली नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, आज पहाटे 2.16 वाजता बिकानेरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची खोली जमिनीच्या आत आठ किमी होती. त्याचवेळी अरुणाचल प्रदेशातील चांगलांग येथे पहाटे 1.45 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची खोली जमिनीच्या आत 76 किमी होती. (हेही वाचा -Earthquake in Gwalior: आता मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये भूकंप, भीतीने लोक घराबाहेर पडले)

गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. नुकतेच, शुक्रवारी सकाळी छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी 10.28 वाजता सुरजपूर जिल्ह्यातील भाटगाव शहर आणि आसपासच्या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यांनी सांगितले की, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खाली होता. अधिका-यांनी सांगितले की, या श्रेणीच्या भूकंपामुळे आंशिक नुकसान होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कच्च्या संरचनेचे नुकसान होऊ शकते. या परिसरात अद्याप कुठलीही हानी झाल्याची माहिती नाही. भूकंपामुळे लोक घराबाहेर पडले होते.

दुसरीकडे, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर आणि आसपासच्या परिसरात शुक्रवारी 4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 10.31 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू ग्वाल्हेरपासून 28 किमी दक्षिण पूर्वेला होता. भूकंपाची खोली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खाली होती.